शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथची आपत्ती शासनाच्या चुकीमुळेच

By admin | Updated: June 15, 2014 00:42 IST

केदारनाथमधील आपत्ती ही नैसर्गिक नसून शासनाची चूक आहे. शासनाने तातडीने पावले उचलली असती तर एकाही यात्रेकरूला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी टीका केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती

उमा भारती यांची टीका : नर्मदा धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत
नागपूर : केदारनाथमधील आपत्ती ही नैसर्गिक नसून शासनाची चूक आहे. शासनाने तातडीने पावले उचलली असती तर एकाही यात्रेकरूला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी टीका केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी शनिवारी येथे केली.
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच नागपुरात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या केदारनाथमध्ये घडलेली दुर्घटना नैसर्गिक नव्हती. त्यासाठी तेथील शासनाची चूक कारणीभूत ठरली. केदारनाथमध्ये पाणी भरले तेव्हा लोकांना आधीच कल्पना द्यायला हवी होती. त्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढता आले असते. परंतु शासनाने आपले काम योग्यपणे बजावले नाही. परिणामी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला.
काँग्रेसप्रणित युपीए सरकारवर जोरदार प्रहार केले. केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने भाजपशासित मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांवर नेहमीच अन्याय केला.
गंगा नदीमध्ये थुंकल्यावरून सध्या बरेच वादळ उठले आहे. यावर त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या की, गंगा नदीमध्ये थुंकल्यास कठोर शिक्षा केली जाईल, यासंबंधात कुप्रचार केला जात आहे. कशाप्रकारे हा प्रकार थांबविता येईल, दंड कसा आकारता येईल, यावर अजून चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नर्मदा नदीवरील धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. सर्व बाबी विचारात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढल्यास सर्वांचाच फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोसेखुर्दकडे लक्ष द्या,
गडकरींची विनंती
उमा भारती या नागपूर दौऱ्यावर असताना त्या काही वेळ रविभवन येथे थांबल्या होत्या. त्यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची नागपूरच्या विविध प्रश्नांसंदर्भात रविभवन सभागृहात बैठक सुरू होती. उमा भारती यांना याबाबत कळताच त्यांनी बैठक स्थळी जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेतली. या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दकडे लक्ष द्या, अशी विनंती नितीन गडकरी यांनी उमा भारती यांना केली.