शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

हलबांना न्याय द्यावा

By admin | Updated: December 6, 2014 02:41 IST

विदर्भातील हलबा, हलबी या जमातींचा कोष्टी या व्यवसाय वाचक शब्दामुळे घटनात्मक दर्जा शासनाने रद्द करू नये, ...

नागपूर : विदर्भातील हलबा, हलबी या जमातींचा कोष्टी या व्यवसाय वाचक शब्दामुळे घटनात्मक दर्जा शासनाने रद्द करू नये, तसेच जिल्हाधिकारी व जात तपासणी समिती हलबा, हलबींचा कोष्टी धंदा असल्याचा खुलासा करून न्याय द्यावा आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय मान्य करावा, अशी मागणी आदिमच्या राष्ट्रीय अध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते यांनी केली असून त्यासंबंधात महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर केले आहे.
इंग्रजकालीन इतिहासाच्या आधारावर हलबा, हलबी जमातीचा घटना यादीत समावेश झाला. मध्य प्रांत व बेरारनंतर मध्य प्रदेशमध्ये हलबांना सवलती मिळत होत्या. विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्यावर सुद्धा सवलती मिळत होत्या. कालांतराने कोष्टी व्यवसायामुळे सरकारने सवलती नाकारण्यास सुरुवात केली. विदर्भातील हलबा, हलबी जमातीचे घटनात्मक अधिकार कोष्टी धंद्यामुळे नाकारता येत नाही, असे अनेक निर्णय उच्च न्यायालयाने दिलेत. या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केली. ते अपील फेटाळण्यात आले.
सन १८२७ ते सन १९५० पूर्वी इंग्रज समाजशास्त्रज्ञांनी विदर्भातील हलबांचा अभ्यास केला. जातीची विभागणी व्यवसाय हा मुख्य आधारभूत घटक धरून अभ्यास केला. सन १८८१ व १८९१ च्या अहवालाप्रमाणे विदर्भात कोष्टी व्यवसायात लाखो हलबा, हलबी असल्याचा उल्लेख आहे. शासनाने हिंदू धर्माचे बंधन घालून जात तपासणी समितीच्या माध्यमाने हलबांचे जात प्रमाणपत्र रद्द करून घटनात्मक अधिकारापासून वंचित करू नये, अशी विनंती केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिट पिटिशन क्रमांक ३४०८/२००१ मध्ये स्पष्ट केले की, प्राचीन इतिहासाप्रमाणे मध्य प्रांत व बेरार येथील हलबा, हलबी ही जमात स्थलांतरणाने विदर्भात आली आणि कोष्टी व्यवसाय केला म्हणून काही दस्तऐवजांवर कोष्टी असे व्यवसायवाचक शब्द लिहिले गेले. हलबांनी कोष्टी व्यवसाय करणे निषिद्ध नाही म्हणून व्यवसायावरून अनुसूचित जमातीचा सामाजिक दर्जा रद्द करता येणार नाही, असा न्यायनिवाडा दिला. या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात गेले. शासनाची याचिका ३ जुलै २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. कोष्टी धंद्यासंबंधी शासनाच्या तीन याचिका फेटाळल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हलबांना न्याय देण्यात यावा, असे आवाहन अ‍ॅड. नंदा पराते यांनी निवेदनातून केले आहे. (प्रतिनिधी)