शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जरा हटके! हरवलेली आजी ४१ वर्षानंतर भेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 10:48 IST

सोशल मिडियामुळे ४१ वर्षांपूर्वी हरवलेली आजी अचानक सापडल्याची चित्रपटात शोभावी अशी घटना येथे घडली.

ठळक मुद्देमुस्लिम व्यक्तीने सांभाळले पोलिसांच्या उदासीनतेमुळे लवकर शोध लागला नाही

लोकमत न्यूृज नेटवर्कनागपूर : नागपुरातील एका व्यक्तीची हरवलेली आजी ४१ वर्षांनंतर भेटली. एवढे दिवस एक मुस्लिम कुटुंब आजीचा सांभाळ करीत होते. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे आजीला स्वत:च्या घरी परतता आले. परंतु, या सकारात्मक प्रसंगासोबत एक नकारात्मक गोष्टही पुढे आली ती म्हणजे, शहर पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे आजीचा लवकर शोध लागू शकला नाही.

पृथ्वी शिंगणे असे नातूचे तर, पंचूबाई (९४) असे आजीचे नाव आहे. पंचूबाई २२ जानेवारी १९७९ रोजी हरवली होती. तिचा मुलगा भैयालाल यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ट्रक चालक नूर खान यांना पंचूबाई दमोह बसस्थानकापुढे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांनी तिला उचलून घरी नेले व तिचा सांभाळ सुरू केला. दरम्यान, त्यांनी १९८२ मध्ये सीताबर्डी पोलीस ठाण्यात पंचूबाईची माहिती दिली होती. परंतु, कोणत्याही पोलिसांनी एकमेकांशी संपर्क करून चौकशी केली नाही. त्यामुळे पंचूबाईला स्वत:च्या घरी पोहचण्याकरिता ४१ वर्षे लागली.

नूर खान यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पंचूबाईचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. परंतु, अनेक दिवस कुणीच पंचूबाईसोबत ओळख दाखवली नाही. एक दिवस पंचूबाईने तिच्या गावाचे नाव परसापूर सांगितले. नूर खान यांचा मुलगा इसरार यांनी गुगलवर शोध घेतला असता हे गाव अमरावती जिल्ह्यात असल्याचे आढळून आले. त्यानंतर गावातील स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने पंचूबाईची माहिती व्हायरल करण्यात आली. दरम्यान, एक व्हिडिओ नागपुरातील डिप्टी सिग्नल येथे राहणारे पंचूबाईचे नातू पृथ्वी शिंगणे यांच्यापर्यंत पोहचला. त्यांची आई सुमनबाई यांनी पंचूबाईला ओळखले. त्यानंतर पृथ्वी यांनी तात्काळ इसरार यांच्याशी संपर्क साधून पंचूबाईला घरी आणले. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया