शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीच्या नावाखाली जंगल पर्यटन!

By admin | Updated: January 8, 2016 03:55 IST

सध्या वन विभाग जंगल पर्यटनाच्या चांगल्याच मोहात पडला आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकारी पर्यटन वाढविण्यासाठी नव नवीन क्लृप्त्या शोधत आहेत.

वन विभागाची नवी क्लृप्ती : सीसीएफने जारी केले पत्र नागपूर : सध्या वन विभाग जंगल पर्यटनाच्या चांगल्याच मोहात पडला आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकारी पर्यटन वाढविण्यासाठी नव नवीन क्लृप्त्या शोधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वन विभागाने पर्यटकांच्या माध्यमातून आपल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नागलवाडी वन परिक्षेत्रात रात्र गस्त, पायदळ गस्त व मचान गस्त सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी अलीकडेच एक पत्र जारी केले आहे. त्या पत्रात बफर क्षेत्रातील अवैध वृक्षतोड, शिकार व अवैध चराई यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी ही गस्त सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यासोबतच रात्रीच्या गस्तीसाठी प्रतिवाहन २ हजार रुपये, पायदळ गस्तीसाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये व मचान गस्तीसाठी प्रत्येकी (चमूसाठी) दोन हजार रुपये आकारले जातील, असेही स्पष्ट केले आहे. यावरू न गस्तीच्या नावाखाली जंगलात ‘नाईट सफारी’ सुरू करण्याबाबत मानस स्पष्ट होत आहे. त्यामुळे वन विभागाची ही रात्र गस्ती सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. वन विभागाच्या त्या पत्रानुसार पर्यटकांना सामुदायिक रात्र गस्त, पायदळ गस्त किंवा मचान गस्तीकरिता चार दिवस पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक कार्यालयातील सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यात वन्यजीव प्रेमी व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.(प्रतिनिधी)