घरासमोरच पत्रकाराला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:06 IST2021-06-03T04:06:48+5:302021-06-03T04:06:48+5:30
-------------- चाकूच्या धाकावर लुटले नागपूर : सक्करदरा येथे चाकूचा धाक दाखवून मेट्रोच्या इलेक्ट्रिशियनची बाईक हिसकावून नेली. न्यू बीडीपेठ येथील ...

घरासमोरच पत्रकाराला लुटले
--------------
चाकूच्या धाकावर लुटले
नागपूर : सक्करदरा येथे चाकूचा धाक दाखवून मेट्रोच्या इलेक्ट्रिशियनची बाईक हिसकावून नेली. न्यू बीडीपेठ येथील रहिवासी अशोक रोकडे मेट्रो रेल्वेमध्ये इलेक्ट्रिशियन आहेत. ते मंगळवारी रात्री उशिरा बाईकने घरी जात होते. छोटा ताजबाग येथील महाकाळकर भवनाजवळ त्यांच्या मागून एका बाईकवर ट्रिपल सीट बसलेले युवक आले. त्यांनी रोकडे यांना रोखले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांची बाईक हिसकावून घेतली. रोकडे यांच्या तक्रारीवरून सक्करदार पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
------------ जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
नागपूर : मेणबत्तीने जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६३ वर्षीय उमा सलीलकुमार बिस्वास या १५ एप्रिल रोजी राहत्या घरी पूजा करीत असताना मेणबत्तीने जळाल्या. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.