पाकिस्तानच्या इंग्रजीचे जगभरात धिंडवडे; FULL च्या ऐवजी लिहिले FOOL
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 20:27 IST2021-09-18T20:24:00+5:302021-09-18T20:27:02+5:30
Nagpur News न्यूझीलंडच्या या निर्णयामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली. याच प्रकरणासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. मात्र या पोस्टमधल्या इंग्लिश मजकुराच्या चुकीमुळे पाकिस्तानवर आता जगभरातून ट्रोलिंग सुरू झाले आहे.

पाकिस्तानच्या इंग्रजीचे जगभरात धिंडवडे; FULL च्या ऐवजी लिहिले FOOL
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेचा हवाला देत पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या या निर्णयामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली. याच प्रकरणासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. मात्र या पोस्टमधल्या इंग्लिश मजकुराच्या चुकीमुळे पाकिस्तानवर आता जगभरातून ट्रोलिंग सुरू झाले आहे. ( Satire on Pakistan's English worldwide; Write FOOL instead of FULL)
एका ट्वीटमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असे लिहिले की, ‘‘न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला त्यांच्या काही सुरक्षा एजन्सीजकडून सतर्क करण्यात आले होते. त्यांनी याबाबत आम्हाला माहिती दिली आणि मालिका स्थगित करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. मात्र पाकिस्तान सरकारने येणाऱ्या सर्व संघांसाठी सुरक्षेची FOOL प्रूफ व्यवस्था केली आहे.”
या ट्विटमध्ये पीसीबीकडून FULL च्या ऐवजी FOOL असे लिहिले गेले. अर्थात FOOL म्हणजे मूर्ख. त्यामुळे या ट्वीटवरून पाकिस्तानच्या इंग्रजीचे पुन्हा जगभरात धिंडवडे निघाले.