पर्यटकाच्या बॅगमधील दागिने व राेख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:32+5:302020-12-30T04:11:32+5:30
देवलापार : रिसाेर्टमध्ये थाबलेल्या पर्यटकाच्या बॅगमधील साेन्याचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण १ लाख ८७ हजार रुपये किमतीचा ...

पर्यटकाच्या बॅगमधील दागिने व राेख लंपास
देवलापार : रिसाेर्टमध्ये थाबलेल्या पर्यटकाच्या बॅगमधील साेन्याचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण १ लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरट्याने लंपास केला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बांद्रा शिवारात शनिवारी (दि. २६) सायंकाळी घडली.
कस्तुरी मंदार मांडे (२७, रा. गणेश साेसायटी, रचना काॅलनी, गाेरक्षण राेड, अकाेला) या त्यांच्या पतीसाेबत देवलापार परिसरात पर्यटनाला आल्या हाेत्या. त्या बांद्रा परिसरातील रिसाेर्टमध्ये मुक्कामी हाेत्या. शनिवारी सायंकाळी त्या रिसाेर्टच्या आवारात बॅडमिंटन खेळत असताना चाेरट्याने त्यांच्या खाेलीत प्रवेश केला. आत कुणीही नसल्याचे पाहून त्याने कस्तुरी मांडे यांच्या बॅगमधील एक लाख रुपये किमतीच्या साेन्याच्या बांगड्या, ८५ हजार रुपयांचे साेन्याचे मंगळसूत्र व दाेन हजार रुपये राेख असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पाेबारा केला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण बाेरकुटे करीत आहेत.