JCB on the sloping bungalow of the notorious hooliganist Santosh Ambkar | कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर जेसीबी

कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर जेसीबी

नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली. मंगळवारी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने या कारवाईला सुरुवात झाली.

आंबेकरने महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर न करता वा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता अलिशान पाच मजली बंगल्याचे अवैध बांधकाम केले होते.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दोन जेसीबी व एक पोकलॅन्डच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात दुपारी १२ च्या सुमारास कारवाईला सुरूवात केली. बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला. तीन ते चार दिवस ही कारवाई चालण्याची शक्यता आहे.

Web Title: JCB on the sloping bungalow of the notorious hooliganist Santosh Ambkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.