शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

"मंत्रिमंडळातील एक जागा योग्य व्यक्तीसाठी राखीव"; अमोल मिटकरींचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:22 IST

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

Amol Mitkari : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले आहेत. मात्र एक पद अद्याप रिकामे आहे. मात्र आता या एका पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ती जागा वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशानाच्या आधीच महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी मंत्रिमंडळात अनेक जेष्ठ नेत्यांना बाजूला करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या ही ४२ झाली आहे. त्यामुळे शेवटचे मंत्रीपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आलं आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच बाबत बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत असताना अमोल मिटकरी यांना मंत्रिमंडळात एक मंत्रिपद खाली ठेवण्यात आलं आहे, ते नेमकं कोणासाठी आहे? जयंत पाटलांसाठी आहे की कोणासाठी आहे? असा पश्न विचारण्यात आला. यावर बोलताना आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार असल्याचे मिटकरी म्हणाले.

"मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच रिकामं ठेवलं होतं. मात्र त्यांनी त्यावेळेस फार विचार केला. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. त्यांना असं वाटलं की आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे बोललेत ना योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य निर्णय घेतील. त्यामुळे तुम्ही बघा आता. वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली आहे," असं अमोल मिटकरी म्हणाले.

"मला जेवढी माहिती आहे, ते लवकरच नक्की येतील. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. योग्य वेळ झालेली आहे. आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार. एका जागेच्या मागील तेच कारण आहे योग्य व्यक्ती, योग्य निर्णय, योग्य वेळ त्यासाठीच एक जागा खाली आहे," असंही मिटकरींनी म्हटलं.

दरम्यान, मुंबई झालेल्या विशेष अधिवेशनातही अमोल मिटकरी यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. "त्यांच्यासाठी देवगिरीची दार अखंड खुली आहेत. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, तो आम्हालाच काय भाजपाला पण हवाहवासा वाटतो. ड्राईव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव ते उत्तम चालक आहेत," असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारAmol Mitkariअमोल मिटकरी