अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 04:43 PM2021-12-09T16:43:24+5:302021-12-09T17:56:18+5:30

मुद्दाम कोणतही कारण नसताना अनिल देशमुख यांना अटक करून ठेवण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. मात्र, ते लवकरच बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

Jayant Patil reaction on anil deshmukhs arrest | अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील : जयंत पाटील

अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील : जयंत पाटील

googlenewsNext

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील, मुद्दाम कोणतही कारण नसताना त्यांना अटक करून ठेवण्याचा सतत प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. त्यांच्यावरील आरोपात काही तथ्य नाही. संपर्कमंत्री म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी व शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली. महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकदुसऱ्याला भेटले हे चांगले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये रिक्त असलेल्या आमच्या पक्षाच्या मंत्रीपदाबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

नागपूर सुधार प्रण्यासमध्ये लवकरच राष्ट्रवादी आपला ट्रस्टी देईल, असेही त्यांनी सांगितले. देशाचे सर्वोच्च सेनानींचा अपघाती मृत्यू होणे हा मोठा हादरा आहे. त्याचं दु:खही आहे. या अपघाताच्या चौकशीत योग्य ते बाहेर येईल. याच्या खोलात जाण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Jayant Patil reaction on anil deshmukhs arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.