शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती साजरी; रक्तदान करून वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 19:58 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.

ठळक मुद्देशेकडो रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व डॉक्टरांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ‘लोकमत’ आणि ‘लाईफलाईन ब्लड बँक कम्पोनंट व अप्रायसेस सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले.‘लोकमत भवनात’ आयोजित या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय सचालक देवेंद्र दर्डा, सुनीत कोठारी, आर्यमन देवेंद्र दर्डा, शिवान देवेंद्र दर्डा, यशोवर्धन सुनीत कोठारी, ‘लाईफलाईन ब्लड बँक कम्पोनंट आणि अप्रायसेस सेंटर’चे संचालक डॉ. हरीश वरभे, स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार व बाबूजींचे सहकारी यादवराव देवगडे, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन यांच्यासह ‘लोकमत’च्या विविध विभागांतील प्रमुख व लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते. आ. विकास ठाकरे यांनी शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या. १८ ते ६३ वर्षांपर्यंतच्या दात्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क घालून व सॅनिटायझरचा वापर करून रक्तदान केले. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेल्या या शिबिरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत दात्यांनी रक्तदान केले. संचालन नेहा जोशी यांनी केले. या वेळी रक्तदात्यांना रक्तदान कार्ड, प्रमाणपत्र, मास्क, सॅनिटायझर आदींचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या आयोजनासाठी ‘लाईफलाईन’ रक्तपेढीचे डॉ. अपर्णा सागरे, प्र्रवीण साठवणे, भूमेश जेलबोंदे, दीपा सोनवणे, कुणाल शिंदे, सुरज चिपळे, सुनील मानापुरे, वैभव लोहकरे व राणी पाठक आदींनी सहकार्य केले.डेंटलच्या डॉक्टरांनी केले रक्तदानशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्या मार्गदर्शनात व सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वैभव कारेमोरे यांच्या नेतृत्वात शुभम पांडे, कुलभूषण मांते, अक्षय थोटे, शुभम अग्रवाल, अपूर्वा देशमुख, प्रतीक मार्ला, शेखर कुमार बन्सल, ऋषिकेश केवट, भावेश अम्बुले, शरद नागरे, वामिनी खोटेले, समृद्धी मेश्राम, ऐश्वर्या मामिडवार यांनी रक्तदान केले.मेयोच्या डॉक्टरांचाही रक्तदानासाठी पुढाकारइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) निवासी डॉक्टरांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डॉ. सागर राजुरकर, डॉ. अविनाश चोरमाळे, डॉ. संदीप जवादे, डॉ. मेघा कळम, डॉ. मृदुशा जांभुळकर यांनी रक्तदान केले.मुलासोबत वडिलांनी केले रक्तदानसीए रोड येथील रहिवासी व गायत्री शक्तिपीठाचे ट्रस्टी ५१ वर्षीय देवेंद्र व्यास यांनी आपला मुलगा शिवमसोबत रक्तदान केले. वडिलांचे हे ५५ वे रक्तदान होते तर मुलगा दुसऱ्यांदा रक्तदान करत होता. रक्तदानाविषयी मनातील भीती, गैरसमजुती दूर व्हाव्यात, असे व्यास म्हणाले.कोविडच्या पार्श्वभूमीवर डॉ. सहारे यांचे रक्तदानकोविडच्या भीतीमुळे रक्तदान शिबिरे बंद पडली आहेत. काही गैरसमजुतीने रक्तदान करीत नाही. ही भीती दूर व्हावी म्हणून रक्तदान केले, असे मत डॉ. कैलास सहारे यांनी व्यक्त केले. रक्तदान महादान आहे, ते प्रत्येकाने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

रक्तदानाने वाढदिवस साजरामहाल येथील रहिवासी राजन मुंडले याचा आज वाढदिवस. गेल्या १० वर्षांपासून तो वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करतो. राजन म्हणाला, गेल्या वर्षापासून ‘लोकमत’मध्ये रक्तदान करीत आलो आहे. रक्ताची गरज कधी, कुणाला पडेल हे कुणालाच माहिती नसते. यामुळे प्रत्येकाने विशेषत: तरुणांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करावे.रक्ताच्या टंचाईमुळे कुणाचा जीव जाऊ नयेरक्ताच्या टंचाईमुळे कुणाचा जीव जाऊ नये म्हणून रक्तदान केले. आज सकाळी वृत्तपत्र वाचले आणि ‘लोकमत’ गाठले. येथे आल्यावर अनेक परिचित मिळाले. आपल्या हातून समाजसेवा घडावी म्हणून रक्तदान करतो. रक्तदानाचा आनंद वेगळाच असतो, अशी प्रतिक्रिया रक्तदानानंतर अक्षय लोंढे यांनी दिली.आरपीएफच्या जवानांकडूनही रक्तदान आरपीएफ अजनी रिझर्व्ह लाईनचे उपनिरीक्षक साहेबराव इंगळे यांच्या मार्गदर्शनात शशिकांत गजभिये, महेश शेंडे, बापू सानप, राम हंस, वीरेश उपाध्याय, रिंकू कुमावत, कैलाश गुजर, जितेंद्र सिंग, अनिल कुमार, मुकेश मिठारवाल, युवराज भास्कर, गीगा राम, सन्नी कुमार, पीएसआय होतीलाल मीना, आर. एम. करांडे व राजपाल चौधरी आदींनी रक्तदान केले.मेहवाश मिर्झा यांचे पहिल्यांदा रक्तदान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांच्या पत्नी मेहवाश यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. याप्रसंगी त्यांची मुलगी फरहा उपस्थित होती. मेहवाश म्हणाल्या, आमची बाबूजींवर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे या शिबिरात रक्तदान केले. सध्या कोरोना संक्रमणामुळे सर्वत्र रक्ताची मागणी वाढली आहे. या शिबिरात गोळा होणारे रक्त गरजू रुग्णांच्या उपयोगात पडेल.

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाVijay Dardaविजय दर्डा