शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

जरा हटके : ‘गुगल गौरी’ ला अख्खा भारतीय संविधान मुखपाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 8:44 PM

भारतीय संविधानाची ३९५ कलमे मुखपाठ असलेली आणि गुगल गर्ल म्हणून ओळख असलेली गौरी मनीष कोढे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी गौरीने संविधानावर असलेली कर्तबगारी दाखवित इंडिया व आशिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नाव कोरले होते. त्यापुढे जाऊन कमी वेळात सर्वाधिक वस्तू स्मरणात ठेवण्याचा जागतिक विक्रमही तिच्या नावे नोंदविला गेला. अल्पवयात बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेली ‘गुगल गर्ल गौरी’ बुद्धिमत्ता व कर्तृत्वाच्या जोरावर उपराजधानीच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरली.

ठळक मुद्देबुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाची ओळखइंडिया, एशिया व जागतिक विक्रमालाही गवसणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानाची ३९५ कलमे मुखपाठ असलेली आणि गुगल गर्ल म्हणून ओळख असलेली गौरी मनीष कोढे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी गौरीने संविधानावर असलेली कर्तबगारी दाखवित इंडिया व आशिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नाव कोरले होते. त्यापुढे जाऊन कमी वेळात सर्वाधिक वस्तू स्मरणात ठेवण्याचा जागतिक विक्रमही तिच्या नावे नोंदविला गेला. अल्पवयात बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेली ‘गुगल गर्ल गौरी’ बुद्धिमत्ता व कर्तृत्वाच्या जोरावर उपराजधानीच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरली.भारतीय संविधानाची कलमे लक्षात ठेवणे म्हणजे भल्याभल्यांसाठी अशक्य गोष्ट वाटते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही कलमे स्मरणात ठेवण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात. गौरीने मात्र ही सर्व कलमे भाग आणि परिशिष्टांसह कंठस्थ करून भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकले होते. मोटिव्हेशनल स्पीकर असलेली तिची आई वैशाली कोढे एकदा संविधानाचे वाचन करीत होती. गौरीने ऐकूनच ते आत्मसात केले. देशाचा कारभार या पुस्तकाने चालतो, हे आईकडून समजल्यावर कुतूहलाने संविधान वाचनाची आवड व्यक्त केली आणि काही दिवसातच त्यातील प्रत्येक कलम तिला मुखपाठ झाले. पुढे इंडिया व आशियाचा विक्रम आणि अहमदाबादचा जिनिअस पुरस्कारही तिला प्राप्त झाला. माध्यमांच्या कॅमेरांचे लक्ष तिच्याकडे वळले आणि संपूर्ण देशाचे लक्ष तिने वेधले होते. यानंतर कमी वेळात ५० वस्तूंची नावे स्मरणात ठेवून तिने गिनीज बुक आॅफ रेकार्ड स्वत:च्या नावे नोंदविला. गौरीने अभिनेता भरत जाधव व मोहन जोशी यांच्यासोबत एका मराठी चित्रपटात अभिनयही केला आहे.एकतर संविधान वाचनाची आवड व्यक्त करणे ही मोठी गोष्ट होती. मात्र त्यापुढे जाऊन संविधान पाठ करण्याची अविश्वसनीय किमया गौरीने साधली. पाठांतर करण्याऐवजी तिने संविधान समजून घेतले. संविधान हा आदर्श आणि सर्वोच्च ग्रंथ असल्याचे ती मानते. यातील बालकामगारांसाठीचा कायदा तिला महत्त्वाचा वाटतो. संविधानातील अनेक कायद्यांचा योग्य उपयोग केला जात नसल्याची खंत तिला आहे. उद्योजक बनून अनेकांना रोजगार देण्याची तिची इच्छा आहे आणि देशाचा राष्ट्रपती होण्याचे स्वप्नही मनात आहे. आज ती १३ वर्षांची आहे. आज कॅमेराचा फोकस तिच्याकडे नसला तरी ध्येय गवसल्याचा आत्मविश्वास तिच्याकडे आहे. महत्त्वाचे म्हणजे एवढ्याशा वयात जमिनीवर पाय ठेवून उंच भरारी घेण्यासाठी हवे ते परिश्रम घेण्याची जिद्द तिच्यात आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेgoogleगुगल