शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

नागपुरात आजपासून ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:46 AM

नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधींच्या मागणीवर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देमनपाने काढला नाही आदेश : महापौरांनी केले स्वेच्छेने सामील होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधींच्या मागणीवर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. परंतु मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जनता कर्फ्यूबाबत मनपातर्फे कुठलेही अधिकृत आदेश काढण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर जनता कर्फ्यूबाबत वेगवेगळे वक्तव्य जारी होत आहेत. अशा परिस्थितीत १९ व २० सप्टेंबर रोजी लावण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यूमध्ये नागरिक किती स्वेच्छेने सहभागी होतात हे येणारी वेळच स्पष्ट करेल.सूत्रानुसार वाढते संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाशी संघर्ष करणाºया कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही थोडा दिलासा देण्याच्या उद्देशाने जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागरिक जर घरात राहिले तर त्यांना थोडाफार दिलासा मिळेल. अनेक व्यापारी संघटनांनीही महापौरांना पत्र लिहून जनता कर्फ्यूसाठी समर्थन दिले आहे. त्यामुळे हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण होणार नाहीजनता कर्फ्यू दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांना कुठलीही अडचण होणार नाही. त्यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे. महापौर जोशी यांनीसुद्धा स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. लोक्रतिनिधींनीही नागरिकांना प्रेरित करण्यासाठी पुढे यावे.दुकाने-प्रतिष्ठाने उघडल्यास दंड होणार - महापौरजनता कर्फ्यू दरम्यान जर कुणी आपली प्रतिष्ठाने, दुकान, कार्यालय सुरु ठेवले तर त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार महापौरांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. तेव्हा न्यूसेंस डिटेक्श्न स्क्वॉड (एनडीएस)तर्फे कारवाई सुद्धा केली जाईल. जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींच्या सहमतीने घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी कुटुंबासाठी, परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी जनता कर्फ्यूमध्ये सामील व्हा. जनता कर्फ्यूचा अर्थ नागरिकांनी स्वत:हून आपली प्रतिष्ठाने, दुकाने, कार्यालय आदी बंद ठेवणे होय. जेणेकरून संसर्ग रोखता येईल. दोन दिवस बंद राहील तर संक्रमणावर ब्रेक लागेल.व्हायरल मॅसेज- महाराष्ट्र सरकारचा कर्फ्यू नाहीसोशल मीडियावर शुक्रवारी एक मॅसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यात मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री यांचे फोटो लावलेले होते. यात लिहिले होते की, कृपया भ्रमित होऊ नका, महाराष्ट्र सरकारने नागपुरात शनिवारी व रविवारी कुठल्याही प्रकारचा कर्फ्यू लावलेला नाही. जर कुणी आपले दुकान, प्रतिष्ठान बंद करायला आले तर आपल्या कॅमेºयाने त्याचे फोटो घ्या. तातडीने पोलीस कंट्रोल ररुम मध्ये १०० नंबरवर फोन लावा.कुठलाही आदेश काढलेला नाही, स्वेच्छेने व्हा सामील - आयुक्तमनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी टिष्ट्वट करून सांगितले की, शनिवारी व रविवारी लागणाºया जनता कर्फ्यूबाबत अनेक फोन आले आहेत. परंतु जनता कर्फ्यूबाबत अधिकृतरीत्या कुठलाही आदेश महापालिकेतर्फे काढण्यात आलेला नाही. नागरिक यात स्वेच्छेने सामील होऊ शकतात. विनाकारण कुणीही घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर राखावे, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर