'Jai Jagat 2020' arrives in Nagpur on a message of justice and peace | 'जय जगत 2020'  न्याय व शांती संदेश यात्रेचे नागपुरात आगमन

'जय जगत 2020'  न्याय व शांती संदेश यात्रेचे नागपुरात आगमन

नागपूर : जगाला न्याय व शांतीचा संदेश देण्यासाठी राजघाट दिल्ली येथून दोन ऑक्टोबरला निघालेली 'जय जगत 2020' ही पदयात्रा बुधवारी 15 जानेवारीला सायंकाळी 4.30 वाजता नागपुरात पोहोचली. सदर बाजार येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून यात्रेतील प्रतिनिधींनी अभिवादन केले. 

यात्रेमध्ये विदेशातील 15 व भारतातील 35 प्रतिनिधी सहभागी आहेत. या संदेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप 30 जानेवारीला सेवाग्राम येथे होत आहे. त्यानंतर दुसरा टप्पा 27 सप्टेंबरला सुरू होऊन 2 ऑक्टोबर 2020 ला जिनेवा स्वित्झर्लंड येथे या शांती यात्रेचा समारोप होईल.

 12 देशातील प्रतिनिधी यात सहभागी आहेत. आचार्य विनोबा भावे यांचा 'जय जगत' हा संदेश घेऊन जगामध्ये शांती आणि न्यायाचा प्रसार करण्यासाठी ही जय जगत यात्रा काढण्यात आल्याचे गांधीवादी विचारवंत राजगोपाल पी. व्ही. यांनी सांगितले.

Web Title: 'Jai Jagat 2020' arrives in Nagpur on a message of justice and peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.