सांडपाणी निगराणीतून कोरोना फैलावाची तपासणी शक्य : प्रा. मनीष कुमार यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:23 PM2020-05-12T23:23:10+5:302020-05-12T23:26:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे शक्य नाही. मात्र सांडपाण्याच्या ...

It is possible to check the spread of corona through sewage monitoring: Pvt. Manish Kumar believes | सांडपाणी निगराणीतून कोरोना फैलावाची तपासणी शक्य : प्रा. मनीष कुमार यांचा विश्वास

सांडपाणी निगराणीतून कोरोना फैलावाची तपासणी शक्य : प्रा. मनीष कुमार यांचा विश्वास

Next
ठळक मुद्देनीरीतर्फे ऑनलाईन व्याख्यान




लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे शक्य नाही. मात्र सांडपाण्याच्या तपासणीतून कोरोना विषाणूच्या सामूहिक फैलावाची व्यापकता तपासणे शक्य होऊ शकते, असा विश्वास भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी), गांधीनगरच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे प्रा. मनीष कुमार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआरआय-नीरी)च्या वतीने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘जलीय पर्यावरणात कोरोना विषाणूचे स्थानांतरण आणि सांडपाणी निगराणी’ विषयावर आयोजित आॅनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था, लखनौचे वैज्ञानिक प्रा. अशोक पांडेय, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार व नीरीच्या जलवायू परिवर्तन व कौशल विकास विभागाचे प्रमुख व मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडेय हेही आॅनलाईन सहभागी झाले. प्रा. मनीष कुमार म्हणाले, सांडपाणी निगराणी तंत्र नवीन नाही. पोलियोच्या समूळ उच्चाटनासाठी आपण या तंत्राचा उपयोग केला आहे. त्यांनी सांगितले, अपशिष्ट जल महामारी विज्ञान हे कोविड चाचणीचे प्रभावी माध्यम आहे. एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर त्याच्या मलोत्सर्गातून त्याची तपासणी केली जाऊ शकते. सांडपाणी तपासताना जिवंत विषाणू नाही तर त्यामधील केवळ विषाणूचे आनुवंशिक पदार्थ (आरएनए) तपासणी केली जाते. विषाणूच्या आरएनएच्या चाचणीसाठी सांडपाण्यातील नमुन्यांची जीन सिक्वेन्सिंग करावी लागते. म्हणून सामूहिक फैलाव तपासण्यासाठी सांडपाण्याची नियमित तपासणी व्हायला हवी, असे ते म्हणाले.
प्रा. अशोक पांडेय यांनीही कोरोनाचा सामूहिक संसर्ग तपासणीसाठी सांडपाणी निगराणी तंत्राचे समर्थन केले. डॉ. राकेश कुमार यांनी कोरोना महामारीत नीरीच्या कामाची माहिती दिली. निगराणी, रोगनिदान, उपचार, रुग्णालयासाठी आवश्यक उपकरण, सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक या बिंदूवर नीरीचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नीरीच्या पर्यावरण विज्ञान व संशोधन पत्रिका वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि विद्यार्थी आॅनलाईन सहभागी झाले.

Web Title: It is possible to check the spread of corona through sewage monitoring: Pvt. Manish Kumar believes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.