शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
2
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
3
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
5
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
6
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
7
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
8
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
9
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
10
"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका
11
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
12
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
13
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
14
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
15
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
16
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
17
IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
18
"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
19
Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
20
Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:26 IST

गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्दे निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी काटोल रोड चौकातील जंक्शन फंक्शन हॉलमध्ये झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, माजी आ. प्रकाश गजभिये, प्रवक्ते प्रवीण कुंटे, दिलीप पनकुले, शब्बीर विद्रोही, दुनेश्वर पेठे, वेदप्रकाश आर्य, अशोक काटले, महिला अध्यक्ष अलका कांबळे, नूतन रेवतकर, रिजवान अन्सारी, रवींद्र इटकेलवार, मधुकर भावसार आदी उपस्थित होते.सत्ता नव्हती तेव्हा लोक भाजपच्या तंबूत दिसायचे. आता सत्ता व गृहमंत्रिपद मिळाल्यामुळे बैठकांमधील गर्दी वाढू लागली आहे. नवनवे चेहरे येऊ लागले आहेत. मात्र, पडतीच्या काळात सोबत राहिलेल्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळावा, अशी अपेक्षा प्रमुख पदाधिकाºयांनी व्यक्त केली. समित्या, मंडळ, महामंडळावरील नियुक्ती त्वरित करा. पक्ष कार्यकारिणीवरही स्थान द्या तसेच विविध आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली.शहरासाठी कोअर कमिटीमहापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करून प्रत्येक बूथवर नियोजन करण्यासाठी नागपूर शहरासाठी कोअर कमिटी नेमली जाईल. त्यात महत्त्वाच्या पदावर असलेल्या तसेच अनुभवी लोकांना स्थान दिले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.१५० वर कार्यकर्त्यांना परवानगी कशी ?शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दी टाळण्याचे, उपाय योजण्याचे आवाहन प्रशासनातर्फेकेले जात आहे. एवढेच नव्हे तर लग्न सोहळ्यासाठीही फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची अट आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या या बैठकीला १५० वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विनापरवानगी झालेल्या या गर्दीची आता महापालिका प्रशसन दखल घेणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर