क्षयरुग्णांना सेवा देणाऱ्यांना नोंदणी करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:51+5:302021-02-05T04:53:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रत्येक क्षयरुग्णावर उपचार होऊन क्षयरोगाचा प्रसार रोखता यावा यासाठी खासगी रुग्णालय व ...

It is mandatory for TB patients to register | क्षयरुग्णांना सेवा देणाऱ्यांना नोंदणी करणे बंधनकारक

क्षयरुग्णांना सेवा देणाऱ्यांना नोंदणी करणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रत्येक क्षयरुग्णावर उपचार होऊन क्षयरोगाचा प्रसार रोखता यावा यासाठी खासगी रुग्णालय व संस्थांना क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ही नोंदणी करावी लागणार आहे. प्रत्येक क्षयरुग्णाची नोंदणी होऊन त्याच्यावर उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हा नोंदणीमागील उद्देश आहे.

नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खासगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांमध्ये क्षयरोग निदान करणाऱ्या शहरातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडिओलॉजी सुविधा असलेल्या संस्था, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथींची सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, सर्व बाह्य रुग्ण व आंतररुग्ण सुविधा, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट यांचा समावेश राहील. या सर्वांना नोंदणी बंधनकारक राहील.

ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते रुग्णांची नोंदणी करणार नाहीत, अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येऊन, भारतीय दंड विधान कलम २६९, २७० नुसार कारवाईसाठी पात्र राहतील. या कलमांतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे.

१ जानेवारी २०२१ पासून निदान होणाऱ्या, उपचार घेणाऱ्या, औषध घेणाऱ्या सर्व रुग्णांची नोंदणी महापालिका क्षयरोग कार्यालयास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क्षयरुग्ण नोंदणीच्या विहित नमुन्यातील माहिती शहर क्षयरोग अधिकारी यांच्याकडे दरमहा पाठविण्याचेही आदेशात नमूद आहे.

Web Title: It is mandatory for TB patients to register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.