सिंचन विहिरी धडक कार्यक्रमास ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ, नागपूर विभागातील ३८६ अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यास मान्यता
By आनंद डेकाटे | Updated: October 26, 2025 23:16 IST2025-10-26T23:15:51+5:302025-10-26T23:16:05+5:30
Nagpur News: नागपूर विभागातील सिंचन विहिरीच्या धडक कार्यक्रमास शासनाने ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून अपूर्ण विहिरींची कामे आता वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

सिंचन विहिरी धडक कार्यक्रमास ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ, नागपूर विभागातील ३८६ अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यास मान्यता
- आनंद डेकाटे
नागपूर - नागपूर विभागातील सिंचन विहिरीच्या धडक कार्यक्रमास शासनाने ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून अपूर्ण विहिरींची कामे आता वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमधील ३८६ अपूर्ण सिंचन विहिरींना मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रानंतर घेण्यात आला. शासनाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, या सर्व विहिरी ३१ मे २०२६ पूर्वी पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त, नागपूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, ३१ मे २०२६ नंतर ही योजना पूर्ण झालेली समजली जाईल. तसेच, जून ते सप्टेंबर २०२५ या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेल्या आणि बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीच्या कामासही शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या साधनांबाबत मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादनात वाढ होईल. महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे हे आमचे उद्दिष्ट असून, सिंचन विहिरींच्या कामांना दिलेली मुदतवाढ ही त्याच दिशेने उचललेले पाऊल आहे.