शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बाजोरिया कन्स्ट्रक्शनकडील चारही सिंचन प्रकल्पांमध्ये अवैधता : 'एसीबी'ची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 10:02 PM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील चारही सिंचन प्रकल्पांमध्ये विविध प्रकारची अवैधता आढळून आल्याची माहिती दिली आहे.

ठळक मुद्दे अमरावती पोलीस अधीक्षकांचे प्रतिज्ञापत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील चारही सिंचन प्रकल्पांमध्ये विविध प्रकारची अवैधता आढळून आल्याची माहिती दिली आहे.बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला वाटप करण्यात आलेल्या चार सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटाविरुद्ध व्यावसायिक अतुल जगताप यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संबंधित सिंचन प्रकल्पांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्प, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्प व भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पाचा समावेश आहे. अमरावती विभागाचे विशेष तपास पथक या चारही प्रकल्पांच्या कंत्राटांची चौकशी करीत असून त्यात अवैधरीत्या सवलत देणे, अवैधरीत्या खर्च वाढवून देणे, आवश्यक प्रमाणपत्रे नसताना कंत्राट देणे इत्यादी अवैधता आढळून आली आहे. या कंपनीने पात्रता नसताना केवळ राजकीय संबंधाच्या बळावर ही कंत्राटे मिळविली असा याचिकाकर्ते जगताप यांचा आरोप आहे. तपास पथक या चार प्रकल्पांसह एकूण २८ सिंचन प्रकल्पांतील घोटाळ्याची चौकशी करीत आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग