शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कामात अनियमितता; महावितरण कनिष्ठ अभियंता सय्यद निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 19:16 IST

कामात हयगय, अनियमितता, कार्यालयीन दस्ताएवजात खोडतोड आणि अपूर्ण कार्यालयीन नोंदीचा ठपका ठेवित महावितरणच्या मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद यांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामात हयगय, अनियमितता, कार्यालयीन दस्ताएवजात खोडतोड आणि अपूर्ण कार्यालयीन नोंदीचा ठपका ठेवित महावितरणच्या मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद यांना निलंबित करण्यात आले आहे.महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी महावितरणची तीन सदस्यीय समिती कार्यालयीन वेळेत मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयात चौकशीसाठी गेली असता कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद या कार्यालयात गैरहजर होत्या, याबाबत चौकशी समितीने कार्यालयात उपस्थित बाह्यस्रोत कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता सय्यद सकाळपासून कार्यालयात आल्या नसल्याची माहिती त्यांनी दिली. तद्नंतर वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल वंजारी यांचेशी संपर्क केला असता कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद आपल्या सोबत मडसावंगी येथे असल्याची माहिती वंजारी यांनी समितिला दिली. या माहितीची शहानिशा करण्यास्तव समितीचे सदस्य मडसावंगी येथे गेले असता सय्यद तेथेही उपस्थित नव्हत्या. सबब, समितीने मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयात येऊन कागदपत्रांची तपासणी केली असता नोंदवह्या अपूर्ण असल्याचे आढळून आले. सोबतच अनेक कार्यालयीन दस्ताएवजावर खोडतोड केल्याचे निदर्शनास आले. शिवाय, ३ जनमित्रांनी ग्राहक तक्रारीचे निवारण करूनही त्यांची गैरहजरी लावण्यात आल्याची बाबही समितीच्या निदर्शनास आली. सय्यद या मुख्यालयी राहत नसल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारीही यावेळी योग्य असल्याच्या समितीच्या निदर्शनास आल्या. या सर्व बाबींची चौकशी करून कामात हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे सय्यद यांच्या कामाची विस्तृत चौकशी होणे आवश्यक वाटल्याने महावितरणतर्फे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsuspensionनिलंबन