नागपुरात मेट्रोचा निर्माणाधीन लोखंडी पिलर झुकला; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 11:47 IST2021-02-24T11:47:06+5:302021-02-24T11:47:32+5:30

Nagpur News वर्धमाननगर भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या बांधकामातील एक मोठा पिलर बुधवारी पहाटेच्या सुमारास झुकल्याने येथील वाहतूक विस्कळित झाली आहे.

Iron pillar under construction of Nagpur Metro bends; No casualties | नागपुरात मेट्रोचा निर्माणाधीन लोखंडी पिलर झुकला; जिवीतहानी नाही

नागपुरात मेट्रोचा निर्माणाधीन लोखंडी पिलर झुकला; जिवीतहानी नाही



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरातील वर्धमाननगर भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या बांधकामातील एक मोठा पिलर बुधवारी पहाटेच्या सुमारास झुकल्याने येथील वाहतूक विस्कळित झाली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
मेट्रो रेल्वेचे नागपुरातील मध्यवर्ती स्टेशन असलेल्या सीताबर्डीपासून ते पारडी चौकातील प्रजापती चौक स्टेशनदरम्यान मेट्रोच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री या ठिकाणचा एक लोखंडी पिलर अचानक अधिक वजनाने खाली झुकला. रात्रीची वेळ असल्याने येथे वर्दळ नव्हती. त्यामुळे जिवीतहानी टळली. मात्र या ठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली आहे.
या आधीही पारडीत निर्माणाधीन असलेले चार पिलर असे झुकल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Iron pillar under construction of Nagpur Metro bends; No casualties

टॅग्स :Metroमेट्रो