शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

मेयोच्या आगीची ‘डीएमईआर’कडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:41 PM

मेयोच्या आगीची वैद्यकीय शिक्षण विभाग व संचालनालयाने (डीएमईआर) दखल घेतली आहे. संबंधित प्रकरणाचा अहवाल पाठविण्याची सूचना अधिष्ठात्यांना केल्या आहेत.

ठळक मुद्देनऊ नवजात बालकांचा थोडक्यात वाचला जीव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागातील नवजात बालकांवरील उपचार केंद्रात (न्यओनॅटल केअर युनिट) ३१ ऑगस्टच्या रात्री पाऊणे तीन वाजताच्या सुमारास ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागल्याने खळबळ उडाली. कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने वेळीच धाडस दाखविल्याने नऊ नवजात बालकांचा जीव वाचला. या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण विभाग व संचालनालयाने (डीएमईआर) दखल घेतली आहे. संबंधित प्रकरणाचा अहवाल पाठविण्याची सूचना अधिष्ठात्यांना केल्या आहेत.मेयोच्या स्त्री रोग व प्रसूती विभागाच्या इमारतीत प्रसूती कक्षासमोर बालरोग विभागाचे पूर्वीचे ‘पीबीयू’ तर आताचे ‘एनआयसीयू’ कक्ष आहे. जन्माला आलेल्या कमी वजनाच्या व श्वास घेता येत नसलेल्या नवजात बालकांना तातडीने उपचार करता यावा म्हणून सहा खाटांचे ‘एनआयसीयू’ कक्ष उभारण्यात आले आहे. परंतु खाटांच्या तुलनेत नेहमीच बालके जास्त असतात. यातच हा कक्ष आतमध्ये आहे. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री या कक्षात अचानक ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली. काही कळण्याच्या आत कक्ष धुराने भरला. कक्षात तीन नवजात बालके ऑक्सिजन, दोन बालके ‘वॉर्मर’ यंत्रावर तर चार बालके उपचाराखाली होते. कर्तव्यावर असलेल्या स्टाफ नर्स सविता ईखार यांनी प्रसंगावधान दाखवून दोन्ही हातात दोन-दोन बालकांना घेऊन बाहेर धाव घेतली. जवळच्या प्रसूती कक्षाच्या बाजूला असलेल्या डॉक्टरांच्या खोलीत त्यांना ठेवले. त्यानंतर दुसऱ्या बालकांना वाचविण्यासाठी पोहचल्या. जे बालके ऑक्सिजनवर होती त्यांचे ऑक्सिजन बंद केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. याचवेळी त्यांच्या मदतीला इतरजणही धावले. यामुळे नऊही बालके सुरक्षित स्थळी पोहचली. घटनेची माहिती होताच बालरोग विभागाच्या डॉक्टरांनीही धाव घेतली. जी बालके ऑक्सिजनवर होती त्यांना पुन्हा ऑक्सिजनवर घेतले, इतरांवरही उपचार सुरू करून वॉर्डात हलविले. या घटनेने मात्र विद्युत व्यवस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला. मेयो प्रशासनाने बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला या घटनेचे स्पष्टीकरण मागितले आहे. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना सांगितले आहे. यामुळे काय उपाययोजना होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)fireआग