शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

सीएमच्या बंगल्यावर अनाहूत पाहुणे

By admin | Updated: November 6, 2014 02:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याजवळ घुटमळणाऱ्या दोन अनाहूत पाहुण्यांनी सुरक्षा यंत्रणेची मंगळवारी चांगलीच तारांबळ उडवली.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याजवळ घुटमळणाऱ्या दोन अनाहूत पाहुण्यांनी सुरक्षा यंत्रणेची मंगळवारी चांगलीच तारांबळ उडवली. त्यांच्या संशयास्पद वर्तणुकीमुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले अन् कसून चौकशी केली. ‘चिंता की कोई बात नही‘ अशी खात्री पटल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नंतर या तरुणांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले.घटना मंगळवारी सकाळी घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्कामी असल्यामुळे रविवारी रात्रीपासून त्यांच्या धरमपेठेतील बंगल्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था होती. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बंगल्यावर येणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, बंगल्यासमोर आणि बंगल्याच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची करडी नजर होती. बंगल्यावर आलेल्या प्रत्येकाचीच भेट घेत मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास टेकडी गणेशाच्या दर्शनाला निघाले. तेथे गणरायांची पूजाअर्चना केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रामगिरी गाठली. येथेही दुपारपर्यंत बैठक, भेटीगाठी सुरूच होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानाहून बाहेर गेल्यामुळे गेल्या ४० तासांपासून निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस सुटकेचा नि:श्वास सोडण्याच्या मुद्रेत होते. मात्र, गेल्या दीड दोन तासांपासून बंगल्याच्या समोरच्या भागात घुटमळत असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. त्याने ही बाब अन्य पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यामुळे बंदोबस्तावरील सर्वच पोलीस चमकले. त्यांनी लगेच या दोन तरुणांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत ते असंबंध उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांचा संशय गडद झाला. या दोन्ही तरुणांचे एकूणच वर्तन पोलिसांची अस्वस्थता वाढविणारे ठरले. त्यामुळे या दोघांना सीताबर्डी ठाण्यात आणण्यात आले. ‘आम्ही येथे नोकरी मागण्यासाठी आलो‘ असे सांगणारे हे तरुण ‘सीएम साहेब ओळखीचे आहे, असेही सांगू लागले. ‘साहेब‘ येथे असताना तुम्ही त्यांना का नाही भेटले, असा पोलिसांनी प्रश्न केला असता ‘त्यांना आम्ही कधीही भेटू शकतो‘, असे सांगून या तरुणांनी पोलिसांनाच निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)