शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर स्थानकावर हैदोस, एकाच दिवशी ९ चोऱ्या; काही तासांतच रेल्वे पोलिसांनी बांधल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:57 IST

​​​​​​​दक्षिण एक्स्प्रेस, पुरी अहमदाबाद एक्स्प्रेस या दोन गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या गोंदिया, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश येथील प्रवाशांचे तब्बल ८ मोबाईल या टोळीने चोरले. त्यानंतर एका प्रवाशाला नागपूर स्थानकाच्या गेटजवळ झोपलेला असताना त्याचाही मोबाईल लंपास केला. एकापाठोपाठ मोबाईल चोरीच्या तक्रारी मिळू लागल्याने रेल्वे पोलिस हैराण झाले.

नागपूर : विविध प्रांतांतील रेल्वे स्थानकं तसेच रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल आणि माैल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) भंडाफोड केला असून, या टोळीतील विविध प्रांतांतील ९ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून नऊ चोरीचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. ३ महिलांसह ९ आरोपींचा समावेश असलेली ही टोळी रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानकावर चोऱ्या करण्यासाठी कुख्यात आहे. रविवारी (दि.८) सकाळी नागपुरात आलेल्या या टोळीने सकाळपासून रात्रीपर्यंत नागपूर स्थानकावर अक्षरश: हैदोस घातला.दक्षिण एक्स्प्रेस, पुरी अहमदाबाद एक्स्प्रेस या दोन गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या गोंदिया, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश येथील प्रवाशांचे तब्बल ८ मोबाईल या टोळीने चोरले. त्यानंतर एका प्रवाशाला नागपूर स्थानकाच्या गेटजवळ झोपलेला असताना त्याचाही मोबाईल लंपास केला. एकापाठोपाठ मोबाईल चोरीच्या तक्रारी मिळू लागल्याने रेल्वे पोलिस हैराण झाले. एकाच दिवशी चोरट्यांनी हैदोस घातल्याची माहिती कळताच पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी गौरव गावंडे तसेच आरपीएफचे निरीक्षक के. के. अंबावत यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे पोलिस, गुन्हे शाखा, आरपीएफ नागपूर आणि सीपीडीएसच्या पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला.

सीसीटीव्हीच्या पाहणीतून आरोपी नजरेत आले. त्यांचा माग काढून त्यांना रविवारी रात्री कलम ३०३(२), ३(५) बीएनएस अन्वये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचे ९ मोबाईलही जप्त करण्यात आले. पकडण्यात आलेले आरोपी छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमधील रहिवासी आहे. ते विविध रेल्वे गाड्यांमध्ये आणि विविध प्रांतात अशाच संघटित पद्धतीने चोरीच्या घटना घडवून आणत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

अशी आहेत आरोपींची नावेएस जया एस सिनू (वय ३०, रा. भिलाई, जि. दुर्ग, छत्तीसगड), एस इंदुपती एन वसंत (३२, रा. भिलाई), सुमलता गणेश सुन्नी (३५, रा. भिलाई), जे पवन जे बडेसाहब (२०, रा. भिलाई), एस सुमा एस सुरेश (३०, रा. सुंदर नगर वेलांगणी माता मरिन चर्चजवळ, भिलाई), डी रोहित डी जोशी (१८, रा. भिलाई), जी राहुल जी शेखर (१८, रा. दुर्ग), राकेश कुमार कुलेश्वर राणा (३०, रा तिलीया थाना खोरी, जि. चित्रा, झारखंड), मोहम्मद रियाज मोहम्मद वजीर (३२, रा. बहांत जि. दरभंगा, बिहार). 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Interstate Thief Gang Busted at Nagpur Station; Nine Arrested

Web Summary : An interstate gang of thieves was busted at Nagpur station. Railway police arrested nine individuals, including three women, recovering stolen mobile phones. The gang targeted passengers on trains and at the station, preying on travelers from various states. Police acted swiftly following multiple theft complaints.
टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिसThiefचोर