शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:45 PM

नागपुरातील प्रसिद्ध व पवित्र दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० कोटींचा प्रस्ताव तयार केला असून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रस्तावाला आज शिखर समितीने मान्यता दिली.

ठळक मुद्दे१०० कोटींच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिकाड्रॅगन पॅलेस विकासासाठी २५ कोटींची मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील प्रसिद्ध व पवित्र दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० कोटींचा प्रस्ताव तयार केला असून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रस्तावाला आज शिखर समितीने मान्यता दिली.मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्र्यांच्या दालनात आज शिखर समितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, आ. नाना श्यामकुळे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गजघाटे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, मुख्य सचिव सुमित मलिक, नगर विकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नितीन करीर, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसकर आदी उपस्थित होते.आजच्या बैठकीत दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण व नागरी सुविधा उपलब्धतेबाबत सादरीकरण करण्यात आले. आधी जिल्हा समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर मुख्यसचिव स्तरावर आज शिखर समितीची बैठक घेण्यात आली. सध्या दीक्षाभूमीकडे उपलब्ध असलेल्या जागेचाच विकास व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.सौंदर्यीकरण व विस्तारीकरणाबाबत भाग १ चा हा प्रस्ताव असून टप्प्याटप्प्याने अन्य भागांचे काम करण्यात येणार आहे. विकास आराखड्याची जबाबदारी नासुप्रकडे असून मे. डिझाईन असोसिएट्स इन्कॉर्पोरेशन नोएडा यांची या प्रकल्पासाठी सल्लागार वास्तुविशारद म्हणून २०१६ मध्ये नियुक्ती झाली आहे. या कंपनीने डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या २२.४ एकर जागेवरील प्रकल्पाचा विकास आराखडा तयार केला. त्यानुसार १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला मान्यता देण्यात आली.या कामांमध्ये व्यासपीठ, दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम, सुरक्षा रक्षक, पहारेकरी खोली, टेहळणी मनोरा, प्रवेशद्वार, नियंत्रण कक्ष, अनामत कक्ष, प्रथमोपचार कक्ष, संग्रहालय, अर्थकेंद्र, व्यावसायिक संकुल, खुले सभागृह, दगडी परिक्र मा, दगडी पदपथ, भाविकांसाठी सुविधा क्षेत्र, प्रसाधने, पिण्याच्या पाण्याची सविधा,विद्युतीकरण, सौर ऊर्जा यंत्रणा, मुख्य स्तूपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण, आॅडिओ सिस्टिम, किरकोळ कामे आदींचा समावेश करण्यात आला आहे.ड्रॅगन पॅलेसला निवासस्थाने व सुविधांसाठी २५ कोटीनागपूर शहराजवळ व कामठी शहरात असलेल्या पवित्र ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विजयादशमीला व दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशातून व परदेशातून हजारो उपासक येथे विपश्यनासाठी येतात. या भाविकांचा येथे मुक्काम असतो. या भाविकांसाठी निवास व अन्य सुविधांची व्यवस्था करण्यासाठी २५ कोटींच्या प्रस्तावाला आज शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिली.ड्रॅगन पॅलेसचा विकास कसा करण्यात येईल याचेही सादरीकरण आज करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. निवासस्थानांची व्यवस्था नसल्याने भाविकांची अडचण होते.ड्रॅगन पॅलेसची मुख्य इमारत सोडून शेजारच्या जागेवर निवासस्थानांसाठी सहा मजली इमारत, भोजनगृह, सभागृह, विविध उपयोगासाठी कक्ष, कार्यालय, कर्मचाऱ्यांसाठी खोल्या, स्नानगृह व शौचालय, पार्किंग, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्व सुविधांसाठी२५ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर