शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पीएसएम विभागाकडून काढले इन्टर्नवरील अधिकार

By admin | Updated: November 16, 2014 00:44 IST

गैरहजर आंतरवासितांकडून (इन्टर्न) विशिष्ट शुल्क आकारून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या तक्रारीचे प्रकरण मेडिकलच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाला (पीएसएम) चांगलेच भोवले आहे.

मेडिकल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : गैरहजेरीच्या शुल्काबाबतचे प्रकरण भोवलेनागपूर - गैरहजर आंतरवासितांकडून (इन्टर्न) विशिष्ट शुल्क आकारून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या तक्रारीचे प्रकरण मेडिकलच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाला (पीएसएम) चांगलेच भोवले आहे. पीएसएम विभागाचे आंतरवासितांवर असलेले अधिकार काढण्याचा निर्णय कॉलेज कौन्सिलने घेतला आहे. आता हे अधिकार अधिष्ठातांच्या मार्गदर्शनात उपअधिष्ठातांना असणार आहे.एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला एक वर्षाची इन्टर्नशिप सक्तीची असते. १२ महिने १२ विभागात एक-एक महिना विद्यार्थ्याला हा ३६५ दिवसांचा इन्टर्नशिप कालावधी पूर्ण करावा लागतो. हा कालावधी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच विद्यार्थ्याची डिग्री आणि सिर्टिफकेटची नोंदणी होते. इन्टर्नशिप करताना एखादा विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तयारी करू शकतो. मात्र, ज्यांना इन्टर्नशिप आणि पी.जी.चा अभ्यास झेपत नाही, असे काही विद्यार्थी इन्टर्नशिपमध्ये खंड देऊन हा कालावधी पूर्ण करतात. यात कोणी ९० तर कोणी ३० ते ४० दिवस गैरहजर राहतात. यावर मागील वर्षी काही विभागप्रमुखांनी आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यावर सक्ती न करता प्रति गैरहजर दिवसामागे ५०० रुपये शुल्क आकारण्याचा तोडगा काढला. मात्र याला काही विभाग प्रमुखांनी विरोध केला. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने ‘इन्टर्नशिपच्या गैरहजेरीवरून गोंधळ!’ या शीर्षकाखाली प्रसिद्धही झाले होते. तरीही गैरहजरीचे शुल्क आकारणे सुरूच होते. विशेष म्हणजे, इन्टर्नचे वेळापत्रक ठरविण्यापासून ते त्यांची विविध ठिकाणी नेमणूक करण्याचे अधिकार पीएसएम विभागाकडे आहे. दरम्यानच्या काळात मेडिकलच्या इन्टर्नकडून गैरहजेरीचे शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी वरपर्यंत पोहचल्या. मंत्रालयाच्या वैद्यकीय शिक्षण आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली. या विषयीची संपूर्ण माहिती मेडिकल प्रशासनाला मागितली. यामुळे प्रशासन हरकतीत आले. शुक्रवारी कॉलेज कौन्सिलमध्ये हा विषय ठेवण्यात आला. संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पीएसएम विभागाकडून इन्टर्नवरील सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला. आता हे अधिकार अधिष्ठातांकडे असणार असून त्यांच्या मार्गदर्शनात उपअधिष्ठातांच्या देखरेखीत याचे कामकाज चालणार आहे. (प्रतिनिधी)