शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यावसायिकांना नाकारला अंतरिम दिलासा

By admin | Updated: February 6, 2015 00:56 IST

अधिकृत प्रतिनिधींना प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश देण्यासंदर्भात अंतरिम आदेश देण्याची नागपूरच्या वाहतूक व्यावसायिकांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमान्य केली आहे.

हायकोर्ट : आरटीओ कार्यालयात एजंट प्रतिबंधाचे प्रकरणनागपूर : अधिकृत प्रतिनिधींना प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश देण्यासंदर्भात अंतरिम आदेश देण्याची नागपूरच्या वाहतूक व्यावसायिकांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमान्य केली आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे नागपूरच्या ४५ वाहतूक व्यावसायिकांनी रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी गुरुवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. याआधी न्यायालयाने अकोला येथील वाहतूक व्यावसायिकांच्या अधिकृत प्रतिनिधींना संबंधित आरटीओ कार्यालयात प्रवेश देण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. या दोन्ही याचिकांवर २० फेब्रुवारी रोजी एकत्र सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. तेव्हापर्यंत राज्य शासनाच्या गृह विभागाचे मुख्य सचिव व इतर प्रतिवादींना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाहतूक व्यावसायिकांनी वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परमिट इत्यादी विविध कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात प्रतिनिधी नेमले आहेत.या प्रतिनिधींना अधिकृत करण्यासाठी आरटीओ कार्यालयाला विशिष्ट माहितीचे पत्र द्यावे लागते. या पत्राचा नमुना ठरलेला आहे. परंतु, प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन आयुक्तांच्या पत्रातील निर्देशाचा चुकीचा अर्थ काढून अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारत आहेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.१२ जानेवारी २०१५ रोजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना पत्र पाठवून एजंटना कार्यालयात प्रवेश करू देऊ नका असे निर्देश दिले आहेत. त्यात अधिकृत प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्याचा उल्लेख नाही. उच्च न्यायालयाच्या ६ जून २००२ रोजीच्या निर्णयानुसार आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रतिनिधींना प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची परवानगी आहे. यासंदर्भात शासनाने ८ जानेवारी २००७ रोजी परिपत्रकही काढले आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. जे. बी. गांधी, तर शासनातर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)