शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

करिअर निवडताना आवड महत्त्वाची

By admin | Updated: September 15, 2014 01:02 IST

दहावी, बारावीनंतर करिअरचे निर्णायक वळण येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना फार गोंधळून जायला नको. आपली आवड आणि कल कशात आहे ते प्रथम ठरवा. यावरून आपले करिअर निवडा.

बारावी नंतर पुढे काय? : लोकमत युवा नेक्स्ट आणि नूतन भारत ज्युनियर कॉलेज यांचा कार्यक्रमनागपूर : दहावी, बारावीनंतर करिअरचे निर्णायक वळण येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना फार गोंधळून जायला नको. आपली आवड आणि कल कशात आहे ते प्रथम ठरवा. यावरून आपले करिअर निवडा. दहावी नंतर विषयाची निवड करताना कोणत्या विषयाचा फायदा पुढे होईल याची माहिती घेऊन त्याची निवड करा. करिअरबाबत जे ठरवले आहेत, त्यात यश संपादित करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याची तयारी ठेवा, असा संवाद मानसशास्त्रज्ञ व मोटिव्हेशनल ट्रेनर, सोशल सायन्स व्हीएनआयटीचे विभाग प्रमुख डॉ. योगेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी साधला.दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याचे वेध लागतात. विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वजणच करिअर निवडीच्या चिंतेत असतात. अशा विद्यार्थ्यांना व पालकांना करिअर म्हणजे नेमके काय, हे कळण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व भारतीय विद्या प्रसारक संस्था व नूतन भारत कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने रविवारी सकाळी करिअर गायडन्स कार्यक्र मांतर्गत दहावी व बारावी नंतर पुढे काय, या विषयावर मार्गदर्शन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून प्रा. संजय कुळकर्णी (पुणे) तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण गडकरी, मनोज वाखरे, गाडे, प्रा. विजय दुबे, श्रीमती प्रधान व हारोडे भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष बी.एम. शास्त्री, सचिव रमेश बक्षी, उपाध्यक्ष मिलिंद महाजन, सहसचिव अतुल गाडगे आदी उपस्थित होते. विद्यार्थी तसेच पालकांचा या कार्यक्र माला भरभरून प्रतिसाद लाभला. प्रा. देशपांडे यांनी करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीचा आवर्जून विचार करावा, कशाच्या आधारावर करिअर निवडावे आदींबाबत यावेळी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)या तीन गोष्टी महत्त्वाच्याप्रा. संजय कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांचे करिअर घडवताना अनेक पालकांना प्रश्न पडतो की, स्कोप कशात जास्त आहे. स्कोपवर करिअरची निवड करण्यापेक्षा या तीन गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. एक मुलाची आवड, दुसरी त्याची क्षमता, तिसरी महत्त्वाची त्याची पात्रता याचा विचार करून करिअर निवडले पाहिजे. अनेकजण उपलब्ध कोर्सपैकी सुरिक्षत करिअरची निवड करतात. करिअरच्या बाबतीत फार चोखंदळ बनू नका. आवडीचे करिअर तयार करण्यासाठी प्रयत्न करा. दुर्दैवाने आवडीचे करिअर मिळाले नाही तर निराश होऊ नका. करिअर म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग. त्यासाठी सर्वस्व पणाला लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.