शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत ‘प्रिन्स’ची हुशारी, आरपीएफची झाडाझडती, १४ लाखांचा गांजा जप्त

By नरेश डोंगरे | Updated: May 4, 2024 21:16 IST

हमसफर, गोंडवाणा एक्सप्रेसमध्ये कारवाई, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील आरोपी, तीन महिलांसह पाच तस्कर जेरबंद...

नागपूर : हमसफर आणि गोंडवाणा एक्सप्रेसमधून होणारी गांजाची तस्करी उघड करून रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दिल्ली तसेच पश्चिम बंगालमधील पाच आरोपींना जेरबंद केले. गांजा तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे, हे विशेष !

गांजाची पहिली मोठी खेप तिरूपती जम्मूतावी हमसफर एक्सप्रेसमध्ये प्रिंस नामक श्वानाने पकडून दिली. ही गाडी बल्लारशाह येथून नागपूरला निघाली असता विकास कुमार आणि नीरज यांच्यासह धावत्या गाडीत तपासणी करणाऱ्या प्रिन्स नामक श्वानाने कोच नंबर बी- २ मधील १७, २० आणि २३ नंबरच्या सीटखाली असलेल्या बॅगचा संशय आला. त्याने तसे संकेत दिल्यानंतर हॅण्डलरने त्या बॅग घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बॅग उघडण्यास सांगितले. त्यानंतर त्यातून ८२ किलो, ६६६ ग्राम वजनाची गांजाची वेगवेगळी ४० पाकिटं निघाली. हा गांजा घेऊन जाणाऱ्या या आरोपींची नावे दीपाली बाला (वय ३६, रा. तुगलकाबाद, नवी दिल्ली), दीपाली दस (वय ५०, रा. तुगलकाबाद, दिल्ली), मीरा सरकार (वय ४२, रा. हिरपूर छितका, नडिया, प. बंगाल), अमलेश ब्रम्हा (वय ३६, रा. तुगलकाबाद, दिल्ली) आणि विश्वजीत मंडल (वय ३९, रा. नटूनविरपूर, नडिया, प. बंगाल) अशी आहेत. त्यांना नागपूर स्थानकावर उतरवण्यात आले. येथे रितसर पंचनामा केल्यानंतर १२ लाख, ४० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर तपासासाठी हे प्रकरण रेल्वेपोलिसांकडे सोपविण्यात आले.आरपीएफच्या दुसऱ्या एका पथकाने हजरत निजामुद्दीन गोंडवाणा एक्सप्रेसच्या दिव्यांगासाठी असलेल्या कोचमधून ८ किलो ३४७ ग्राम गांजा भरलेल्या दोन ट्रॉली बॅग जप्त केल्या. या गांजाची किंमत १ लाख, २५ हजार, २०५ रुपये एवढी आहे. हा गांजा तस्करी करणारे कोण, ते स्पष्ट झाले नाही. या दोन्ही प्रकरणात पकडण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत १३ लाख, ७५ हजार, ९९९ रुपये आहे. विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार आणि सहायक सुरक्षा आयुक्त कुमार कुरूप यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफच्या नार्कोस टीमने ही कामगिरी बजावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेPoliceपोलिस