शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानासाठी प्रेरणा देणारे ‘लोकमत’चे गीत ‘इस बार चलो रक्तदान करो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST

नागपूर : रक्तदानाबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांना रक्तदानासाठी प्रेरणा मिळावी यासाठी ‘लोकमत’ने ‘इस बार ...

नागपूर : रक्तदानाबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांना रक्तदानासाठी प्रेरणा मिळावी यासाठी ‘लोकमत’ने ‘इस बार चलो रक्तदान करो...’ हे गाणे तयार केले आहे. हे गाणे तरुणांना विशेष प्रेरणा देत आहे. आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्तावर केवळ आपलाच अधिकार नाही, तर संकटप्रसंगी गरजूंच्यादेखील ते कामी आले पाहिजे, हा संदेश या गाण्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सर्वांनी स्वार्थाचा त्याग करत रक्तदान करण्याची प्रेरणा हे गाणे देत आहे.

रक्तदानासाठी प्रेरणा देणाऱ्या गाण्याच्या ओळी लोकमत समाचारचे सहायक उपाध्यक्ष मतीन खान यांनी लिहिल्या आहेत. तर गायक आदित्य सालनकर यांनी याला स्वर दिला आहे. आदित्यनेच निखिल जॉर्जसह या गाण्याचे कंपोजिंग केले आहे. हे गाणे २ जुलै रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीच्या प्रसंगी आयोजित ‘लोकमत’च्या महारक्तदान मोहिमेच्या शुभारंभाच्या वेळी रक्तदान मोहिमेला समर्पित करण्यात येईल. ‘लोकमत’च्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत २ ते १५ जुलैदरम्यान हा उपक्रम राबविण्यात येईल, हे विशेष. या माध्यमातून विविध ठिकाणी महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कोण आहेत आदित्य व निखिल

आदित्य सालनकरने गायलेली दोन गाणी प्रसिद्ध झाली आहेत. चित्रपटसृष्टीतील नावाजलेले डीजे सुकेतू, इरिक पिल्लई, कल्याण बरुआ आणि फातिमा सना शेखसोबत आदित्यने काम केले आहे. सोशल मीडियावर आदित्यच्या आवाजाचा बोलबाला असून यूट्यूबवर आदित्यला ८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. निखिल जॉर्जदेखील चित्रपटसृष्टीशी अनेक वर्षांपासून जुळले आहेत. त्यांनी प्रीतम दा सोबतदेखील काम केले आहे. बर्फी या चित्रपटातील दोन प्रसिद्ध गाण्यांचे गायन त्यांनी केले आहे. शुभम चोपकरने बासुरीवादन केले आहे. कोरसमध्ये अनुजा घाडगे, रियाजी, साहित्य सिंघई, निखिल पॉल जॉर्जने साथसंगत केली आहे. या गाण्याची निर्मिती एनजीपी म्युझिकने केली आहे. याचे प्रकल्प व्यवस्थापक मोहित मनुजा हे आहेत. सागर अगलेने मिक्सिंगचे काम केले आहे, तर गाण्याचे रेकॉर्डिंग साहित्य सिंघईने केले आहे.