शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

‘गर्दी’साठी निरीक्षकांचा वॉच

By admin | Updated: April 9, 2016 03:07 IST

भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतर्फे गुरुवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित ‘नैतिकतेचा शंखनाद’ कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी झाली नाही.

काँग्रेस नेत्यांची परीक्षा : विधानसभानिहाय होणार मोर्चाचे चित्रीकरणकमलेश वानखेडे नागपूरभाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतर्फे गुरुवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित ‘नैतिकतेचा शंखनाद’ कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी झाली नाही. त्यामुळे आता कस्तूरचंद पार्कवर ११ एप्रिल रोजी आयोजित काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी होईल की नाही याची धास्ती काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे सभेला लोक जमविण्यासाठी विधानसभानिहाय नेत्यांना ‘टास्क’ देण्यात आला असून आकडा दिला तेवढे लोक संबंधित नेत्याने आणले की नाही याची खातरजमा करण्यासाठी विधानसभानिहाय निरीक्षक नेमण्यात आले आहेत. भाजपसारखे आपले हसू होऊ नये याची चिंता काँग्रेसला सतावत आहे.अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी कस्तूरचंद पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोपीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी या सभेच्या तयारीसाठी नागपुरात तीनवेळा आढावा बैठका घेतल्या. त्यावेळी स्थानिक नेत्यांनी ‘दस हजार, बीस हजार’ असे आकडे दिले. संबंधित नेत्यांच्या नावासमोर त्यांनी दिलेले आकडे लिहून एक यादी तयार करण्यात आली आहे. आता संबंधित नेते खरच एवढे लोक आणतात का, याची खातरजमा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने काही जणांवर विशेष जबाबदारी सोपविली असून पक्षात याची कमालीची गुप्तता पाळली जात आहे. नागपूर शहरातील सहा व ग्रामीण मधील सहा विधानसभा मतदारसंघातील लोकांनी सभेला येण्यासाठी शहरात कुठे गोळा व्हायचे याचे ‘पॉईंट’ ठरवून देण्यात आले आहेत. राहुल यांचा मुक्काम, सराफांना भेटणार सभेनंतर सोनिया गांधी दिल्लीला परत जातील, तर राहुल गांधी यांच्या मुक्कामाची शक्यता वर्तविली जात आहे. सराफा व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाला समर्थन द्यावे व आमची मागणी केंद्र सरकारकडे मांडावी, या मागणीसाठी सराफा व्यापाऱ्यांनी राहुल गांधी यांची वेळ मागितली आहे. काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सराफा व्यापाऱ्यांना भेटीची वेळ मिळण्याची शक्यता असून त्यासाठी राहुल गांधी नागपुरात मुक्काम करणार आहेत. एसपीजीला शुक्रवारी तसे निरोप आले आहेत.