शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्पेक्टर दया नायक निलंबित

By admin | Updated: July 3, 2015 02:59 IST

वर्षभरापुर्वी बदली होऊनही नागपूर परिक्षेत्रात रुजू न झाल्यामुळे वादग्रस्त पोलीस अधिकारी (एन्काउंटर स्पेशालिस्ट) ...

डीजींचे आदेश : नागपुरात रुजू न झाल्याने कारवाई नागपूर : वर्षभरापुर्वी बदली होऊनही नागपूर परिक्षेत्रात रुजू न झाल्यामुळे वादग्रस्त पोलीस अधिकारी (एन्काउंटर स्पेशालिस्ट) दया नायक याला गुरुवारी निलंबित करण्यात आले. बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ केल्यामुळे एखाद्या नामवंत तेवढ्याच वादग्रस्त पोलीस अधिका-याला निलंबित करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे पोलीस यंत्रणेत चर्चेला उधान आले आहे.अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांसोबतच अनेक खतरनाक टोळळ्यातील गुंडांना यमसदनी धाडणा-या दया नायकला काही वर्षांपुर्वी पोलीस दलासह सामान्य नागरिकांनीही डोक्यावर घेतले होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्याचा उदोउदो होत होता. याच दरम्यान तो एका टोळीतील गुंडांकडून दुस-या टोळीतील गुंडांचा गेम करण्यासाठी सुपारी घेत असल्याची जोरदार चर्चावजा आरोप झाले आणि दया नायक वादग्रस्त झाला. त्याची चौकशी झाली आणि त्याला निलंबितही करण्यात आले. दोन वर्षांपुर्वी तो पुन्हा नोकरीत रुजू झाला. गेल्या वर्षी त्याची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली. मात्र, वरिष्ठांशी लागेबांधे आणि ब-यापैकी राजकीय पाठबळ असल्यामुळे दया नायक नागपूर परिक्षेत्रात रुजू व्हायला तयार नव्हता. वारंवार सूचनापत्र, आदेश देऊन तो नागपूरात यायला तयार नसल्यामुळे अखेर पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी गुरुवारी त्याच्या निलंबनाचे आदेश जारी केले. पोलीस यंत्रणेत खळबळमुख्यमंत्री नागपूरचे, गृहखातेही मुख्यमंत्र्यांकडेच असताना अनेक पोलीस अधिकारी नागपूर-विदर्भात यायला तयार नाहीत. गेल्या महिन्याभरात झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यातून त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अनेकांनी आपली नागपूर-विदर्भात झालेली बदली रद्द करून घेतली. लोकमतने त्याबाबतही वृत्तही प्रकाशित केले होते. त्याची गृहखात्याकडून गांभिर्याने दखल घेतली गेली. याच पार्श्वभूमीवर दया नायकचे निलंबन झाल्याची माहिती आहे.