नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:58 PM2020-06-16T23:58:54+5:302020-06-17T00:00:37+5:30

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

To inspect the industries in Nagpur: Collector | नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी

नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देउद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. बचत भवन सभागृहात मंगळवारी अधिकारी व उद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, उपाध्यक्ष शेखर पटवर्धन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे सचिव शशिकांत कोठारकर व नितीन लोणकर उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी कामगारांचे स्क्रिनिंग, उद्योगाचे निर्जंर्तकीकरण, सुरक्षित अंतर तसेच कामगारांची आरोग्य तपासणी इत्यादी संदर्भात आकस्मिक भेटीदरम्यान पाहणी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी व उद्योग क्षेत्रातील पदाधिकारी या पथकात समाविष्ट असतील. गुरुवारपासून हिंगणा एमआयडीसीमधून या भेटी सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग समूहाने शिफारस केल्यास कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या सर्व कामगारांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्याची व्यवस्था केली जाईल. कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य असून कामाच्या व जेवणाच्या टेबलवर जास्त कर्मचारी असणार नाहीत. याची दक्षता उद्योगाने घ्यावी. आपल्या कारखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगाराची व अभ्यागतांची संपूर्ण माहिती उद्योगाने ठेवावी, असेदेखील रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: To inspect the industries in Nagpur: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.