इनोव्हाची दुचाकीला धडक, दाम्पत्यासह मुले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:07 IST2018-07-20T23:07:12+5:302018-07-20T23:07:48+5:30
सुसाट वेगात जाणाऱ्या इनोव्हाने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाले. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरी (बारोकर) शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

इनोव्हाची दुचाकीला धडक, दाम्पत्यासह मुले जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुसाट वेगात जाणाऱ्या इनोव्हाने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाले. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरी (बारोकर) शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये प्रवेश मनोहर गरनार (४०), प्रतीक्षा प्रवेश गरनार (३५), प्रणव प्रवेश गरणार (५) व अनुष्का प्रवेश गरनार (२) रा. वडधामना, ता. नागपूर (ग्रामीण) यांचा समावेश आहे. प्रवेश गरनार हे त्यांच्या कुटुंबीयांसह एमएच-४०/एस-०३१२ क्रमांकाच्या मोटरसायकलने कोंढाळीहून कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धाच्या दिशेने जात होते. ते खापरी (बारोकर) येथील बसस्टॉपजवळ पोहोचताच नागपूरहून अमरावतीच्या दिशेने वेगात जाणाºया एमएच-३०/एआर-५५६६ क्रमांकाच्या इनोव्हाने त्यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली.
त्यात दुचाकीचा मागील भाग चक्काचूर झाला तर, दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि चौघांनाही लगेच कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून इनोव्हाचालक संदीप इंगळे, रा. बार्शीटाकळी, जिल्हा अकोला यास अटक केली. ती इनोव्हा मिलिंद सोनवणे, रा. अकोला यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.