संक्रमणही वाढतेय आणि मृत्यूही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:02+5:302021-04-11T04:09:02+5:30

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी होताना दिसत नाही. शनिवारी संक्रमितांची संख्या हजाराने घटली असली तरी शुक्रवारच्या तुलनेत १ ...

Infections are on the rise and so are deaths | संक्रमणही वाढतेय आणि मृत्यूही

संक्रमणही वाढतेय आणि मृत्यूही

Next

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी होताना दिसत नाही. शनिवारी संक्रमितांची संख्या हजाराने घटली असली तरी शुक्रवारच्या तुलनेत १ मृत्यू अधिक झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी ५१३१ नवीन संक्रमित आढळले आहेत, तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहराबरोबरच नागपूर ग्रामीणमध्येही संक्रमितांचा आलेख वाढतच आहे. आतापर्यंत एकूण २,७१,३५५ पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी ५७०६ लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी २८३७ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाला लढा देणाऱ्यांची संख्या आता २,१४,०७३ वर पोहोचली आहे; परंतु रिकव्हरी रेट घटून ७८.८९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ३४४५, ग्रामीणचे १६८० व जिल्ह्याबाहेरील ६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये शहरातील १८२०, ग्रामीणमधील १०१७ लोकांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात शनिवारी २०६६६ नमुने तपासण्यात आले. यातील शहरात १००७१ व ग्रामीणमध्ये १०५९५ आहेत. खासगी लॅबमध्ये २०६५, अँटिजन टेस्ट ३५१, एम्स ८७७, मेडिकल लॅब ८४५, मेयो ४९९, नीरी १४१, नागपूर विद्यापीठाच्या लॅबमधून ३५३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

- सक्रिय रुग्ण ५० हजारपार

नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदा सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. शनिवारी सक्रिय रुग्णांची संख्या ५१,५७६ नोंदविण्यात आली. यात शहरात ३४,१८९ व ग्रामीणध्ये १७,३८७ आहे. यात ११,४८७ विविध रुग्णालयांत भरती आहेत, तर ४०,०८९ होम आयसोलेशनमध्ये आहेत.

अ‍ॅक्टिव्ह ५१५७६

कोरोनामुक्त २१४०७३

मृत ५७०६

Web Title: Infections are on the rise and so are deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.