ग्रामीण भागात संक्रमण येतेय आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:27+5:302020-12-04T04:23:27+5:30
रामटेक/काटोल/कळमेश्वर/कन्हान : नागपूर शहरात बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आहे. बुधवारी जिल्ह्यातील ...

ग्रामीण भागात संक्रमण येतेय आटोक्यात
रामटेक/काटोल/कळमेश्वर/कन्हान : नागपूर शहरात बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आहे. बुधवारी जिल्ह्यातील १३ तालुक्यात ७५ रुग्णांची नोंद झाली. रामटेक तालुक्यात बुधवारी दोन रुग्णांची भर पडली. शहरातील भगतसिंग वॉर्ड व ग्रामीणमधील परसोडा येथील प्रत्येकी एकाचा यात समावेश असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या ८४८ झाली आहे. यातील ७६६ रुग्ण बरे झाले आहेत. काटोल तालुक्यात ७७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत शहरातील राठी ले-आऊट व तारबाजार येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पारशिवनी तालुक्यातील कांद्री कोविड सेंटर येथे १८ जणांची चाचणी करण्यात आली. तीत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ८४१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ७९८ रुग्ण बरे झाले आहेत. कळमेश्वर तालुक्यीत तीन रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्र, तेलकामठी आणि उपरवाही येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.