कुख्यात कडवला कोरोनाने अडवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:00 IST2020-07-20T22:59:28+5:302020-07-20T23:00:40+5:30
कुख्यात गुंड मंगेश कडव याला कारागृहातून ताब्यात घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून नागपूरचे मध्यवर्ती कारागृह चर्चेला आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारागृहातून मंगेश कडवला ताब्यात घेण्याचे टाळल्याचे समजते.

कुख्यात कडवला कोरोनाने अडवले!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड मंगेश कडव याला कारागृहातून ताब्यात घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून नागपूरचे मध्यवर्ती कारागृह चर्चेला आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारागृहातून मंगेश कडवला ताब्यात घेण्याचे टाळल्याचे समजते.
गेल्या दोन आठवड्यापासून मंगेश कडव गुन्हे शाखा पोलिसांच्या कस्टडीत होता. कडवविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील सक्करदराच्या गुन्ह्याच्या पीसीआरची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने कडवला कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे पोलीस सोमवारी त्याला हुडकेश्वरच्या गुन्ह्यात कारागृहातून ताब्यात घेणार आणि त्याचा पुन्हा पीसीआर मिळवणार, असे रविवारी एका अधिकाऱ्याने सांगितले होते. मात्र कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कारागृहात पोहोचलेल्या कडवला ताब्यात घेणे जोखमीचे ठरेल, याचा अंदाज आल्यामुळे पोलिसांनी त्याला कारागृहातून परत ताब्यात घेण्याचे टाळल्याची सूत्रांची माहिती आहे.