नागपुरातील अपघातात इंदूरच्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 22:35 IST2020-11-24T22:33:58+5:302020-11-24T22:35:21+5:30
Accident Indore youth dies, nagpur news पाण्याच्या भरधाव टॅंकरने दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील इंदूरच्या एका तरुणाचा करुण अंत झाला.

नागपुरातील अपघातात इंदूरच्या तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाण्याच्या भरधाव टॅंकरने दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील इंदूरच्या एका तरुणाचा करुण अंत झाला. फकरुद्दीन हुसेन बादशाह (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा माणिकबाग रोड इंदोर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी होता. गेल्या काही दिवसापासून तो नागपुरातील उपाली कॉलनी, शास्त्री लेआऊटमध्ये राहत होता.
फकरुद्दिन त्याच्या एक्टिवाने मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास जुन्या कामठी मार्गाने जात असताना यशोधरानगरात पाण्याच्या भरधाव टॅंकर चालकाने त्याला जोरदार धडक मारली. त्यामुळे फकरुद्दीनचा करुण अंत झाला. गौतम रामचंद्र ढोगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलिसांनी आरोपी टॅंकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्रीपर्यंत आरोपीचे नाव पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही.