शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोची नागपूर-गोवा विमान उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:25 IST

Nagpur : इंडिगोची नागपूर-गोवा उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली आहे. मागील आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उड्डाणाच्या आधी विमानातून फ्यूल लीक होत असल्याचे आढळले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडिगोचीनागपूर-गोवा उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली आहे. मागील आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उड्डाणाच्या आधी विमानातून फ्यूल लीक होत असल्याचे आढळले होते. या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण तत्काळ थांबवण्यात आले आणि गोवा तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. मात्र, या बिघाडानंतर मुंबईहून आलेल्या तज्ज्ञांच्या टीमने विमानाच्या 'नोज व्हील' जवळील फ्यूल गळतीचा अचूक शोध घेऊन ती दुरुस्त केली.

सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण केल्यानंतर आणि पूर्ण समाधान झाल्यानंतरच हे विमान 'फेरी फ्लाइट' म्हणून नागपूरहून दिल्लीला पाठवण्यात आले. त्यानंतर ते हैदराबादमार्गे पुन्हा सेवेत दाखल झाले आहे. आता हे विमान पुन्हा प्रवासी सेवेसाठी सज्ज आहे.

दरम्यान, नागपूरहून नवीन उड्डाणांची अपेक्षा असलेल्या प्रवाशांसाठी मात्र थोडी निराशाजनक बातमी आहे. इंडिगोने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही नवीन मार्गावर उड्डाण सेवा सुरू करणे शक्य नाही.

सध्या नागपूरहून दररोज सुमारे २५ उड्डाणे देशातील १० शहरांकडे जातात आणि तेवढ्याच उड्डाणांची ये-जा सुरू आहे. समर शेड्यूलनुसार २९ मार्चपासून काही उड्डाणांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

प्रवाशांवर भाडेवाढीचा बोझा

दरम्यान, आखाती देशात सुरू असलेल्या युद्ध आणि वाढत्या तणावाचा फटका विमान वाहतूक क्षेत्राला बसू लागला आहे. जेट फ्यूलच्या दरात मोठी वाढ झाल्याने एअरलाईन्स कंपन्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. परिणामी, भाडेवाढ ठरली असून त्याचा भार थेट प्रवाशांवर पडत आहे. ही परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास भविष्यात तिकिटांचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IndiGo's Nagpur-Goa Flight Service Resumes After Fuel Leak Repair

Web Summary : IndiGo's Nagpur-Goa flight service is back after a fuel leak grounded it. Experts repaired the issue, and the plane is now operational. No new routes are planned currently. Rising jet fuel costs are increasing fares for passengers.
टॅग्स :nagpurनागपूरIndigoइंडिगो