शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

वीज वितरण फ्रेंचायसीवर इंडिया पॉवरची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:24 AM

शहरातील वीज वितरण फ्रेंचायसी एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने भागीदार (कंपनीसाठी स्ट्रॅटेजिक पार्टनर) बनविण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देनागपूरपासून दिल्लीपर्यंत हालचाली एसएनडीएल कर्मचाऱ्यांची वाढली चिंता

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वीज वितरण फ्रेंचायसी एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने भागीदार (कंपनीसाठी स्ट्रॅटेजिक पार्टनर) बनविण्याची तयारी सुरू केली आहे. वीज वितरण क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेली कंपनी इंडिया पॉवर यासाठी उत्सुक आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये दिल्लीत अनेक बैठका झाल्या आहेत. इंडिया पॉवरच्य चमूने नागपुरात येऊन वीज वितरण प्रणालीची पाहणीसुद्धा केली आहे. यादरम्यान एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढत आहे. त्यांनी व्यवस्थापकांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांना वितरित केलेल्या इन्सेन्टिव्हची रक्कम कापण्यात आल्याचा विरोधसुद्धा दर्शविला आहे.महावितरणने १ मे २०११ रोजी शहरातील तीन डिव्हिजनची वीज वितरण यंत्रणा स्पॅन्को कंपनीच्या हवाली केली होती. स्पॅन्को ही जबाबदारी सांभाळू शकली नाही. त्यांनी एस्सेल समूहाच्या एस्सेल युटीलिटी कंपनीला आपली भागीदारी विकली. सप्टेंबर २०१२ मध्ये एस्सेल युटीलिटी एसएनडीएलच्या नावाने शहरातील कामकाज सांभाळले. आज ही कंपनी गंभीर आर्थिक संकटात सापडली आहे. कर्मचाऱ्यांना वितरित केलेली परफॉर्मन्स लिंक इन्सेन्टिव्ह (पीएलआय) एकूण पगाराच्या २० टक्के रक्कम परत घेण्याची वेळ कंपनीवर आली आहे. कंपनीने तीन भागात ही रक्कम परत घेणार असल्याचे घोषित केले आहे. मार्चमध्ये पहिली किस्त परत घेण्यात आली आहे.कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये यावरून प्रचंड असंतोष पसरला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनी हेड सोनल खुराणा यांना पत्र पाठवून याचा विरोधही केला आहे. पत्रात म्हटले आहे की, पैसे परत घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ते आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पूर्ण एकाग्रतेने काम करण्यास ते असमर्थ आहेत.खुराना यांनी त्यांना सांगितले की, या प्रकरणाबाबत मुख्यालयाशी चर्चा सुरू असून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे सूत्रांनी दावा केला आहे. की आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनी भागीदार (पार्टनर) शोधत आहे. युद्धस्तरावर काम सुरु आहे. कंपनीचे प्रेसिडेंट कमल माहेश्वरी यांनी सांगितले आहे की, विकास व नवीन तंत्रज्ञान मिळवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. असे सांगितले जाते की, एसएनडीएल्या दिल्ली येथील मुख्यालयात दररोज इंडिया पॉवरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. कंपनीच्या एका टीमने नागपुरात येऊन एसएनडीेलच्या कामकाजाचा आढावासुद्धा घेतला आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार हे डील पक्के होत असल्याच्या दिशेने आहे.

आसनसोलमध्ये वितरण लायसेन्सकधीकाळी डीपीएससी या नावाने ओळखली जाणारी कंपनी इंडिया पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना १९१९ मध्ये झाली आहे. कंपनीकडे आसनसोल आणि राणीगंज येथील वीज वितरणाचा परवाना (लायसेन्स) आहे. ओडिशामध्ये सुद्धा कंपनी सक्रिय आहे. आता नागपूरच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :electricityवीज