शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Independence Day 2018! झेंडा उंचा रहें हमारा ....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:33 AM

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनाचे औचित्य : ५१ राष्ट्रपती पदक मिळवून महाराष्ट दुसऱ्या स्थानी

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे. सर्वाधिक ७७ पदके उत्तर प्रदेशाने मिळवली. मात्र, त्यातील शौर्यपदक केवळ एकच आहे हे येथे उल्लेखनीय.देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवारत असलेल्या सुरक्षा यंत्रणा तसेच त्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावलेल्या अत्युच्च कामगिरीचा आढावा घेत दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध मानाच्या पदकाने सन्मानित केले जाते. अतुल्य शौर्य दाखविणाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक (पीपीएमजी), खडतर ठिकाणी शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना शौर्यपदक (पीएमजी), वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्यांना (पीपीएम) आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्यांना (पीएम) हे मानाचे पदक देऊन संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव केला जातो. यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यनिहाय आणि दलनिहाय ९४२ पदकं जाहीर करण्यात आली. त्यात २ राष्ट्रपती पोलीस पदकं, १७७ शौर्यपदकं, ८८ वैशिष्ट्यपूर्ण सेवापदकं आणि ६७५ गुणवत्तापूर्ण सेवापदकांचा समावेश आहे.यापैकी सर्वाधिक ७७ पदके उत्तर प्रदेशने मिळवली आहे तर ५१ पदके मिळवून महाराष्ट्रने आपला झेंडा देशाच्या सन्मानाच्या शिखरावर रोवला आहे. महाराष्ट्रातील आठ जणांना खडतर ठिकाणी सेवेबद्दल शौर्यपदकं , वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल तीन जणांना तर गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या ४० जणांना पदकं घोषित झाली आहेत. ३७ शौर्यपदकांसह एकूण ४७ पदकं प्राप्त करून जम्मू-काश्मीर तृतीय, ३२ पदकांसह आसाम चतुर्थ आणि २९ पदके मिळवून ओडिशा तसेच गुजरातने पाचवे स्थान पटकावले आहे.

नागपूरला सात पदकांचा सन्माननागपूरला सात पदकांचा सन्मान मिळाला. त्यापैकी नुकतेच नागपुरातून पुण्यात बदलून गेलेले सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल, पोलीस कर्मचारी रमाकांत बावीस्कर, कल्पना धवड, रेल्वे सुरक्षा दलातील हवलदार ए रामाक्रीष्णा आणि एएएसआय सी. बी. सिंग यांना तसेच नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी राजू हाते, संजय राजारामजी तलवारे तसेच विठ्ठल उगले आणि महेंद्र शहाणे यांनाही सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

सीआरपीएफ अव्वलस्थानी !दलनिहाय (फोर्सवाईज) कामगिरीचा आढावा घेऊन जाहिर झालेल्या पदकांपैकी एकूण १५४ पदके मिळवत केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) देशात अव्वलस्थान मिळवले आहे. सीआरपीएफने दोन राष्ट्रपती शौर्य पदकं, ८९ शौर्यपदकं, पाच वैशिष्टयपूर्ण सेवा पदकं आणि ५८ गुणवत्तापूर्ण सेवा पदकं जाहिर झाली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एकूण ६१ पदके मिळवली आहेत. आयबीने ३४, सीबीआयने ३० तर सीआयएसएफने २६ पदके पटकावली आहेत.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस