शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

संविधान व बाबासाहेबांमुळेच महिलांना स्वातंत्र्य व अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:57 PM

भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले, असे प्रतिपादन अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी केले.

ठळक मुद्देदीक्षाभूमी : महिला परिषदेत जयश्री शेळके यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले, असे प्रतिपादन अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी केले.६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहब आंबेडकर स्मारक समिती व दीक्षाभूमि महिला धम्म संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवारी दीक्षाभूमीवर आयोजित महिला परिषदेअंतर्गत ‘भारतीय संविधान आणि लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता अ‍ॅड. शेळके बोलत होत्या. याप्रसंगी समितिच्या अध्यक्षा डॉ. कमलताई गवई, रेखाताई खोब्रागडे, अ‍ॅड. स्मिता कांबले, समितीच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. सरोज आगलावे, सहसचिव तक्षशिला वाघधरे, प्रा. डॉ. प्रज्ञा बागडे, डॉ. सरोज शामकुवर प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, संविधानामुळेच प्रत्येकाला स्वातंत्र्य, समतेच्या मूल्याने हक्कांची लढाई लढता येते. धर्म स्वातंत्र्यामुळे प्रत्येकजन त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यास मोकळा आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण व सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र आज काही शक्ती संविधान हटविण्याचे षडयंत्र रचत आहेत. त्यांचा संघटीत होउन प्रतिकार करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.रेखा खोब्रागडे यांनी मनोगत व्यक्त करताना, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सुरक्षाकवच प्रदान केले असून त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा दर्जा वाढला असल्याचे मत व्यक्त केले. संविधानामुळेच देश एकसंघ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काही विषमतावादी लोक संविधान बदनाम करून त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे संविधान रक्षणासाठी सर्वांनी एकत्रीत येण्याचे आवाहन प्रा. डॉ. सरोज आगलावे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या तरुण कार्यकर्त्यांनी संविधान पोवाडा सादर केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तक्षीशीला वागधरे यांनी केले. संचालन वंदना जीवने यांनी तर लता गजभिये यांनी आभार मानले.आजपासून धम्मदीक्षा सोहळादीक्षाभूमीवर मंगळवारपासून धम्मदीक्षा सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात सकाळी ९ वाजता दीक्षा सोहळा सुरू होईल. दीक्षा ग्रहण करण्यासाठी देशविदेशातून शेकडो लोक दीक्षाभूमीवर पोहचले आहेत.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीWomenमहिला