शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

क्राईम ग्राफ वाढतोय...

By admin | Updated: December 13, 2014 02:51 IST

उपराजधानीत गेल्या दोन महिन्यात शंभरावर गुन्हे घडले आहेत. खून, बलात्कार, गोळीबार, अवैध दारुविक्री, भूखंड बळकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,

नागपूर : उपराजधानीत गेल्या दोन महिन्यात शंभरावर गुन्हे घडले आहेत. खून, बलात्कार, गोळीबार, अवैध दारुविक्री, भूखंड बळकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असा दावा करीत भाजप आमदारांनी गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांची कोंडी केली. या गुन्ह्यांसाठी संबंधित ठाण्यातील पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही या आमदारांनी केली.आ. सुधाकर देशमुख यांनी लक्षवेधी सूचना मांडत नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीकडे सरकारचे लक्ष वेधले. देशमुख म्हणाले, हुडकेश्वर येथे तोतया पोलिसांनी एका शिक्षिकेवर बलात्कार केला. कोळशाची तस्करी व खंडणीत गुंतलेल्या एका गुन्हेगाराने आपल्याच एका साथीदारावर धरमपेठेत गोळीबार केला. भांडेप्लॉट झोपडपट्टीमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. याशिवाय दररोज चेनस्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. भूखंड माफिया जागा रिकामी करून घेण्यासाठी नागरिकांना धमकावित आहेत. हे सर्व पोलिसांना माहीत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. गुन्हेगारांना पोलिसांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावर गृहराज्यमंत्री पाटील यांनी गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले असून ‘क्वीक रिस्पॉन्स’साठी शहरातील २३ ठाण्यांना प्रत्येकी एक सुसज्ज वाहन देण्यात आल्याचे सांगितले. वाढत्या गुन्हेगारीची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आ. विकास कुंभारे यांनी नाईक तलाव परिसरातील तडीपार असलेला गुंड पिंटु ठवकर हा नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार केली. ठवकर नागरिकांना दिसतो, मात्र पोलिसांना दिसत नाही, पोलीस कारवाई का करीत नाही, असा सवाल त्यांनी केली. यावर राज्यमंत्री पाटील यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. युग चांडक अपहरण व हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणीही कुंभारे यांनी केली. (प्रतिनिधी)दारुविक्रीची चौकशी होणारबुटीबोरीच्या मुख्य चौकात खुलेआम होणारी दारुविक्री व मद्यपानाचा मुद्दा शुक्रवारी विधानसभेत गाजला. भाजपचे आ. समीर मेघे यांनी ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित या संबंधीच्या वृत्ताचा हवाला देत कारवाईची मागणी केली. यावर संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिले. मेघे म्हणाले, बुटीबोरीच्या चौकात खुलेआम दारुविक्री व पिण्याचा प्रकार सुरू आहे. या चौकापासून ५० मीटर अंतरावर एक मंदिर आहे. ‘लोकमत’ने या संबंधीचे वृत्त त्या ठिकाणच्या छायाचित्रांसह प्रकाशित केले आहे. लोकमतने एवढा मोठा पुरावा सादर केला असतानाही पोलिसांतर्फे द्याप कारवाई करण्यात आलेली नाही, असे सांगत संबंधित दारुविक्री दुकानाचा परवाना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.