हॉस्पिटलचा प्रलंबित रजिस्ट्रेशनच्या नूतनीकरणाचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:45+5:302021-01-08T04:23:45+5:30

नागपूर : शहरात सुमारे ६० टक्के हॉस्पिटल ही जुन्या इमारतींत आहेत. यातील अनेकांना ‘चेंज ऑफ युज’ व ...

Increased rate of renewal of pending registration of the hospital | हॉस्पिटलचा प्रलंबित रजिस्ट्रेशनच्या नूतनीकरणाचे वाढले प्रमाण

हॉस्पिटलचा प्रलंबित रजिस्ट्रेशनच्या नूतनीकरणाचे वाढले प्रमाण

नागपूर : शहरात सुमारे ६० टक्के हॉस्पिटल ही जुन्या इमारतींत आहेत. यातील अनेकांना ‘चेंज ऑफ युज’ व ‘फायर सेफ्टी’चे निकष पाळणे शक्य होत नाही. यामुळे हॉस्पिटलच्या रजिस्ट्रेशन नूतनीकरणाची प्रलंबित प्रकरणे वाढल्याचे वास्तव आहे. महानगरपालिका यावर तोडगाही काढत नसल्याने हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत चालला आहे.

‘मुंबई नर्सिंग अ‍ॅक्ट एम ५९’ नुसार खाटांची सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलसाठी महापालिकेचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. कायद्यानुसार नियमावलींची पूर्तता केल्यानंतरच हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन केले जाते. विशेष म्हणजे, शहरात ६४३ रुग्णालये रजिस्टर आहेत. पूर्वी या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण पाच वर्षांनंतर केले जायचे. २०१७ पासून दर तीन वर्षांनंतर नूतनीकरण करावे लागते. परंतु जाचक अटींमुळे अनेकांचे नूतनीकरण रखडत चालले आहे. महापालिकेच्या नियमावलीनुसार ‘फायर सेफ्टी’चे निकष खूप कडक आहेत. त्यांचे पालन करणे, विशेषत: जुन्या इमारतीतील हॉस्पिटलसाठी शक्य होत नाही. तसेच रहिवासी ठिकाणी म्हणजेच फ्लॅटमधील रुग्णांसाठी ‘चेंज ऑफ युज’ परवानगी बंधनकारक आहे. मात्र ही परवानगी घेण्यासाठी मूळ इमारतीच्या रचनेत बदल करावे लागत असल्यानेही रुग्णालयांच्या अडचणी वाढल्या आहेत.

५० हजार लिटर्सची टाकी कशी तयार करणार?

‘लोकमत’ने या संदर्भात काही हॉस्पिटलच्या संचालकाशी संवाद साधला. त्यांच्यानुसार, रजिस्ट्रेशनच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या महापालिकेच्या अटी जुन्या इमारतीत असलेल्या रुग्णालयांना जाचक ठरत आहेत. ‘फायर सेफ्टी’साठी इमारतीच्या तळमजल्यावर ५० हजार लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्याचा नियम आहे. जुन्या इमारतीत एवढी मोठी टाकी तयार करणेच शक्य नाही.

पर्यायी जिन्याचीही अडचण

नियमांमध्ये रुग्णालयाच्या इमारतीला एक वापरासासाठी आणि दुसरा पर्यायी जिना असणे आवश्यक आहे. पर्यायी जिन्याची लांबी व रुंदी ही इमारतीच्या मजल्यांनुसार निश्चित अशी रचना करण्याची अट आहे; परंतु अनेक जुन्या इमारतींत यासाठी जागाच सोडलेली नाही. यामुळे या अटींची पूर्तताच करता येत नसल्याचे हॉस्पिटल संचालकांचे म्हणणे आहे.

‘चेंज ऑफ यूज’ परवानगी घेणे कठीण

शहरात सुमारे ६० टक्के हॉस्पिटल्स ही जुन्या इमारतीत आहेत. त्यांना ‘चेंज ऑफ यूज’ परवानगी घेणे कठीण जात आहे. याला घेऊनच अनेक हॉस्पिटलने नाराजी व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी याच मुद्द्याला घेऊन ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने संपाचे हत्यार उपसले होते.

Web Title: Increased rate of renewal of pending registration of the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.