शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमधील रुग्णात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 20:51 IST

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने व ८० टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने पुढील उपचारासाठी मेयो, मेडिकल व एम्समधून मोठ्या संख्येत रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. सुरुवातीला १५० खाटांमध्ये सुरू केलेले हे सेंटर १८० वर रुग्ण जाताच ३०० खाटांचे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वाढती रुग्णसंख्या पाहता या खाटाही कमी पडण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने व ८० टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने पुढील उपचारासाठी मेयो, मेडिकल व एम्समधून मोठ्या संख्येत रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. सुरुवातीला १५० खाटांमध्ये सुरू केलेले हे सेंटर १८० वर रुग्ण जाताच ३०० खाटांचे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वाढती रुग्णसंख्या पाहता या खाटाही कमी पडण्याची शक्यता आहे.कोरोनाची मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी नागपुरात मेयो व मेडिकलमध्ये प्रत्येकी ६०० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ तयार करण्यात आले. मात्र गेल्या आठवड्यापर्यंत नागपुरात कोविड केअर सेंटर नव्हते. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड हॉस्पिटलच्या ‘एचडीयू’ व ‘आयसीयू’मध्ये ठेवले जात होते. अशा रुग्णांवर विशेष उपचाराची गरज तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळ खर्ची होत होता. अखेर गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आमदार निवासाला कोविड केअर सेंटर करण्याचा निर्णय घेतला. ५ जुलैच्या रात्रीपासून मेयो, मेडिकल व एम्समधील रुग्णांना येथे भरती करणे सुरू झाले. सुरुवातीला ‘बी’ इमारतीत १५० वर खाटांची सोय करण्यात आली होती. परंतु पाच दिवसात या खाटा फुल्ल झाल्याने व ‘ए’ इमारतीमध्ये बांधकाम सुरू असल्याने ‘सी’ इमारतीत रुग्णांना ठेवले जात आहे. सध्या दोन्ही इमारती मिळून साधारण ३०० वर खाटांची सोय केली आहे. परंतु कोरोनाबाधित त्यातही लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने या खाटा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गरज पडल्यास क्वारंटाईन सेंटर होणार कोविड केअर सेंटरनागपूर जिल्ह्यात ८० ते ८५ टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नाहीत. यामुळे भविष्यात जास्तीत जास्त कोविड केअर सेंटरची गरज पडणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी गरज पडल्यास क्वारंटाईन सेंटरला कोविड केअर सेंटर केले जाईल, अशी माहिती दिली.

टॅग्स :MLA Hostelआमदार निवासCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या