शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

‘व्हीएनआयटी’तील ‘प्लेसमेंट’च्या आकड्यात वाढ ; यंदा ८६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 00:33 IST

Increase in the number of placements in VNIT, Nagpur news देशातील अग्रणी अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या ‘व्हीएनआयटी’मध्ये २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चा आकडा वाढलेला दिसून आला. वर्षभरात पात्र असलेल्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले.

ठळक मुद्दे रिक्त जागांमध्येदेखील होतेय वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील अग्रणी अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या ‘व्हीएनआयटी’मध्ये २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चा आकडा वाढलेला दिसून आला. वर्षभरात पात्र असलेल्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. २०१८-१९ च्या तुलनेत हा आकडा ५६ ने वाढल्याचे दिसून आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘व्हीएनआयटी’कडे विचारणा केली होती. २०१९-२० मध्ये ‘व्हीएनआयटी’मध्ये किती विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले, वर्षभरात किती जागा रिक्त होत्या, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१९-२० मध्ये ‘व्हीएनआयटी’तील ५२१ विद्यार्थी ‘प्लेसमेंट’साठी पात्र होते. १३० कंपन्यांकडून यातील ४४९ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ‘प्लेसमेंट’ची ‘ऑफर’ मिळाली. संगणक विज्ञान व यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. तर स्थापत्य अभियांत्रिकीतील केवळ ५१ टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली.

दरम्यान, २०१९-२० मध्ये १ हजार ४८३ पैकी १ हजार ३५५ जागांवरच प्रवेश झाले व १२८ जागा रिक्त राहिल्या होत्या. २०१८-१९ मध्ये हाच आकडा ९४ इतका होता.

सर्वाधिक पॅकेज ३८ लाखांचे

२०१९-२० साली ‘व्हीएनआयटी’तील विद्यार्थ्यांना सरासरी ८.५५ लाखांचे ‘पॅकेज’ मिळाले. ‘पॅकेज’चा सर्वाधिक आकडा ३८.२१ लाख इतका होता. २०१२-१३ पासूनच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता त्याच वर्षी विद्यार्थ्याला सर्वात अधिक प्रतिवर्ष ६५ लाख रुपयांचे ‘पॅकेज’ मिळाले होते.

‘प्लेसमेंट’ची आकडेवारी

वर्ष- निवड

२०१२-१३ - ३४५

२०१३-१४ - ३८०

२०१४-१५ - ४४२

२०१५-१६ - ३६४

२०१६-१७ - ४२६

२०१७-१८ - ४०१

२०१८-१९ - ३९३

२०१९-२० - ४४९

रिक्त जागा

वर्ष - प्रवेशक्षमता - रिक्त जागा

२०१७-१८ - १,१६६ - १०६

२०१८-१९ - १,४२२ - ९४

२०१९-२० - १,४८३ - १२८

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर