शांतीधारा संकल्पनामुळे पुण्यकर्मात वृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:55+5:302021-04-19T04:07:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विश्व शांती वर्धमानोत्सवात श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीच्यावतीने ऑनलाईन ...

शांतीधारा संकल्पनामुळे पुण्यकर्मात वृद्धी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्व शांती वर्धमानोत्सवात श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीच्यावतीने ऑनलाईन सोहळा साजरा होत आहे. यात राष्ट्रसंत आचार्यश्री गुणधरनंदी गुरुदेव यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. शांतिधारा केल्याने पुण्य, धर्माची वृद्धी होते. जो शांतिधारा करतो, बघतो आणि करवून घेतो त्याला धन, धान्य, ऐश्वर्य, बल, कीर्ती, रिद्धी आणि शांती प्राप्त होते. सर्व प्रकारचे विघ्न दूर होतात. जी व्यक्ती शांतिमंत्र ऐकते, शांतिधारा करते व करवून घेते, तिचे कधीच अनिष्ट होत नाही. पुण्यात वृद्धी होते आणि धर्मवृद्धी होत असल्याचे गुरुदेवांनी सांगितले. जैनाचार्य गुप्तिनंदी गुरुदेव यांनी मार्गदर्शन करताना, महावीर असतील तर महाविनाश होणार नाही, महाविकास होईल, अशी भावना व्यक्त केली. धर्मसभेचे संचालन गणिनी आर्यिका आस्थाश्री माता यांनी केले. श्री नवग्रह शांती विधान सुनील, पुनम, साहिल, गुंजन जैन, सतीश, निशू, शुभम जैन, कोमल, राहुल, गौरी, चिराग, मंगला, विजय साहूजी, प्रवीण, अर्चना काला, मनोज, राखी, कुणाल, सुरभी गंगवाल यांनी केले.
..................