शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

सक्करदरा कार्यालयात आयकरने उघड केला ५०० कोटींचा घोटाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:45 IST

हिंगणा कार्यालयानंतर मोठा खुलासा : २१ सह दुय्यम निबंधक कार्यालयांवर विभागाची नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयकर विभागाच्या इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन विंगने नागपूर जिल्ह्यातील काही सह दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमी दराने रजिस्ट्री केल्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे. यामध्ये सक्करदरा कार्यालयात तब्बल ५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवहार कमी दराने नोंदवले गेल्याचे समोर आले आहे.

यापूर्वीच आयकर विभागाने हिंगणा सह दुय्यम निबंधक कार्यालयात १,३०० कोटी रुपयांचा घोटाळा पकडला होता. त्यानंतरच इतर कार्यालयांची चौकशी सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. रजिस्ट्रीचे व्यवहार 'स्टेटमेंट ऑफ फायनान्शिअल ट्रान्ड्रॉक्शन' (एसएफटी) डेटाबेसमध्ये नोंदवलेलेच नव्हते. अशा प्रकारच्या चुकांमुळे निधीचा प्रवाह आणि काळ्या पैशाचे मार्ग शोधण्याच्या प्रयत्नांना अडथळा येतो. अशा गैरप्रकारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यात नोटीस बजावण्यासह दंड आकारणी आणि आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

उत्पन्न कमी; मात्र कोट्यवधींच्या मालमत्तांची खरेदीकाही खरेदीदारांचे वार्षिक उत्पन्न फक्त १० ते २० लाख रुपये दाखवले गेले होते, तरीही त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. काहींनी या खरेदीसाठी 'असुरक्षित कर्ज' हा स्रोत दाखवला असला तरी अधिकाऱ्यांना अन्य अघोषित निधीच्या स्रोतांबद्दल शंका आहे. त्याचबरोबर विक्रेत्यांकडून कॅपिटल गेन टॅक्स न भरल्याची अनेक प्रकरणेही पुढे आली आहेत. आयकर अधिनियमांतर्गत विभागाला ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक असलेल्या व्यवहारांची माहिती निर्धारित कालावधीत देणे बंधनकारक आहे. काही नवीन प्रकरणांमध्ये गैररिपोटिंग जाणीवपूर्वक करण्यात आली; ही केवळ चूक किंवा तांत्रिक त्रुटी नव्हती, असे आयकर विभागाच्या लक्षात आले आहे.

हिंगणा प्रकरणाची पार्श्वभूमीयाआधी हिंगणा एसआरओमध्ये झालेल्या उच्च-प्रोफाइल चौकशीत १,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार एसएफटी प्रणालीमध्ये नोंदवलेच गेले नव्हते. उच्च-मूल्याचे व्यवहार विभागाच्या नजरेतून दूर राहावेत म्हणून महाराष्ट्राच्या 'ई-सरिता' मालमत्ता नोंदणी पोर्टलमध्ये नोंदवलेले व्यवहार एसएफटी डेटाबेसमधून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचे उघड झाले होते.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयnagpurनागपूरfraudधोकेबाजी