नागपूरमध्ये बाथरूममधून येईपर्यंत चोरट्याने पळविले दागिने
By दयानंद पाईकराव | Updated: May 27, 2023 16:40 IST2023-05-27T16:39:51+5:302023-05-27T16:40:29+5:30
घराच्या समोरील खोलीचे दार उघडे ठेऊन सोफ्यावर दागिने काढून ठेवले आणि त्या बाथरुमला गेल्या. बाथरूममधून आल्यानंतर त्यांचे ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना सोफ्यावर दिसले नाही.

नागपूरमध्ये बाथरूममधून येईपर्यंत चोरट्याने पळविले दागिने
नागपूर : बाथरूमला गेलेल्या महिलेचे ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने पळविल्याची घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २४ मे रोजी रात्री ८.५० वाजताच्या सुमारास घडली. योगिता सुभाष गोसेवाडे (वय ३६, रा. म्हाडा कॉलनी, चौथा माळा, रामकुलर बाजारजवळ, रामसुमेरबाबानगर) या आपल्या ऑफिसमधून घरी आल्या.
घराच्या समोरील खोलीचे दार उघडे ठेऊन सोफ्यावर दागिने काढून ठेवले आणि त्या बाथरुमला गेल्या. बाथरूममधून आल्यानंतर त्यांचे ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना सोफ्यावर दिसले नाही. अज्ञात आरोपीने त्यांच्या दारातून प्रवेश करून दागिने पळविले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.