भरधाव दुचाकीने उडवले, रुग्णालय गाठण्याआधीच मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: February 19, 2024 16:06 IST2024-02-19T16:05:06+5:302024-02-19T16:06:05+5:30
भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवर स्वार व्यक्तीचा मृत्यू झाला.

भरधाव दुचाकीने उडवले, रुग्णालय गाठण्याआधीच मृत्यू
दयानंद पाईकराव, नागपूर : भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवर स्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. दिलीप गणपतराव पारधी (५४, रा. बाराद्वारी, कापसी खुर्द, पारडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रविवारी सायंकाळी आपली मोटारसायकल क्रमांक एम. एच. ४०, ए. वाय-२५१७ ने जात होते. तेवढ्यात मोटारसायकल क्रमांक सी. जी. २५, एल-५७६१ च्या आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दिलीप यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
यात दिलीप हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी दुचाकीचालक फरार झाला. दिलीप यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी श्रीराम गणपतराव पारधी (४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नविन कामठी पोलिसांनी आरोपी दुचाकीचालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३०४ (अ), सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.